Indore Crime News esakal
देश

संतापजनक! TV दाखवण्याच्या बहाण्यानं तीन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार; 50 वर्षीय आरोपीला अटक

आरोपीनं मुलीला टीव्ही पाहण्याच्या बहाण्यानं घरी बोलावलं होतं.

सकाळ डिजिटल टीम

2 जानेवारीला रामसिंगनं तिन्ही मुलांना टीव्ही पाहण्यासाठी बोलावलं होतं. टीव्ही पाहून दोन मुलं परत घरी आली. मात्र, तीन वर्षांची मुलगी टीव्ही बघून घरी परतली नाही.

Indore Crime News : इंदूरमध्ये आजीच्या घरी आलेल्या तीन वर्षांच्या मुलीवर एका 50 वर्षीय व्यक्तीनं बलात्कार केला. मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये दुखू लागल्यावर तिनं हा प्रकार आईला सांगितला. पोलिसांनी आरोपीला अटक केलीये.

आरोपीनं मुलीला टीव्ही पाहण्याच्या बहाण्यानं घरी बोलावलं होतं. मुलगी त्याला नाना म्हणते. राजेंद्र नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीची आई मूळची खरगोनची रहिवासी असून ती तीन मुलांसह इंदूरच्या राजेंद्र नगरमध्ये तिच्या आईच्या घरी आली होती. घराशेजारी राहणाऱ्या रामसिंग जदवाडचंद यांच्या घरी मुलं टीव्ही पाहण्यासाठी जात असत.

2 जानेवारीला रामसिंगनं तिन्ही मुलांना टीव्ही पाहण्यासाठी बोलावलं होतं. टीव्ही पाहून दोन मुलं परत घरी आली. मात्र, तीन वर्षांची मुलगी टीव्ही बघून घरी परतली नाही. आईला संशय आल्यावर तिनं मोठ्या मुलीला रामसिंगच्या घरी बघायला पाठवलं. दरवाजा उघडल्यानंतर रामसिंग तीन वर्षीय मुलीसह आतमध्ये होता. नंतर मुलगी रडत बाहेर आली, पण आईनं याकडं दुर्लक्ष केलं.

आरोपीला पाहताच मुलगी रडू लागली

दुसऱ्या दिवशी रामसिंग महिलेच्या घरी आला आणि मुलीला आपल्या कुशीत घेऊ लागला. त्याला पाहताच मुलगी ढसाढसा रडू लागली. आईला संशय आला आणि तिनं मुलाची विचारपूस केली. त्यावेळी मुलीनं हातवारे करून तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये दुखत असल्याचं सांगितलं आणि ती रडू लागली. गुरुवारी रात्री आईनं पोलीस ठाणं गाठून आरोपी रामसिंगविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी रात्री उशिरा त्याला अटक केलीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ashok Saraf : कार्यक्रम अशोक सराफ यांच्या पुरस्काराचा, चर्चा मुश्रीफ, बंटी पाटील, उदय सामंत यांच्या राजकीय टोलेबाजीची, मामाही म्हणाले...

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

प्रेमसंबंधाचा संशय! लेकीला हात बांधून कालव्यात ढकललं, बापाने व्हिडीओसुद्धा शूट केला; आई अन् लहान भाऊ बघत राहिले

Hot Chocolate For Periods: पीरियड्समध्ये हॉट चॉकलेट का प्यावं? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Mumbai News: मुंबईकरांचा त्रास कमी होणार! पाऊस थांबताच काँक्रीटीकरणाला सुरुवात; पालिकेची खड्डेमुक्त शहराकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT