5G service
5G service sakal
देश

वर्षाखेरीस फाइव्ह-जी सेवा सुरू होईल; अश्विनी वैष्णव

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशात येत्या ऑगस्ट-सप्टेंबरपासून फाइव्ह-जी सेवेला सुरवात होईल आणि या वर्षाच्या अखेरीस देशातील २० ते २५ शहरांमध्ये ती सुरू होईल, असे दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी सांगितले.

देशात सध्या असलेल्या मोबाईल डेटाच्या किमती जागतिक सरासरीपेक्षा लक्षणीयरित्या कमी आहेत. अमेरिकेतील २५ डॉलरच्या तुलनेत ते फक्त २ डॉलर आहेत. नवीन सेवांचे दरही असाच मापदंड निर्माण करतील, असेही त्यांनी नमूद केले.

डिजिटल नेटवर्कमध्ये जगासाठी एक विश्वासार्ह स्रोत म्हणून आपले स्थान मजबूत करण्यासाठी भारत सज्ज असून भारताने विकसित केलेली फोर -जी आणि फाइव्ह-जी उत्पादने आणि तंत्रज्ञान घेण्यासाठी अनेक देश उत्सुक आहेत, असेही त्यांनी सांगितले. सरकारने अल्ट्रा-हाय-स्पीड इंटरनेटसह फाइव्ह-जी सेवेसाठी सुमारे ४.३ लाख कोटी रुपयांच्या स्पेक्ट्रमचा लिलाव करण्यास मंजुरी दिली आहे. २६ जुलै २०२२ रोजी सुरू होणाऱ्या या लिलावादरम्यान ७२ गिगा हर्टझ स्पेक्ट्रम उपलब्ध करण्यात येईल.

दूरसंचार क्षेत्रातील सुधारणांमुळे स्थैर्य

डेटा दर, कॉल ड्रॉप्स, कॉल क्वालिटी या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक महत्त्वाची आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जाहीर करण्यात आलेल्या दूरसंचार क्षेत्रातील सुधारणांमुळे उद्योगाला स्थैर्य प्राप्त झाले आहे, असे वैष्णव यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 06 मे 2024

Women’s T20 World Cup: स्कॉटलँडने रचला इतिहास, वर्ल्ड कपचं पहिल्यांदाच मिळवलं तिकीट; श्रीलंकाही ठरले पात्र

Sharad Pawar : बारामतीकरांना धक्का अशक्य;निवडणुकीची अमेरिकेतही उत्सुकता

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

SCROLL FOR NEXT