5g spectrum auction ends total bids at over rs 1.5 lakh cr report  
देश

5G स्पेक्ट्रम लिलाव संपला, 1.5 लाख कोटींहून अधिकची लागली बोली

सकाळ डिजिटल टीम

5G Spectrum Auction : 5G स्पेक्ट्रमचा लिलाव करण्याची प्रक्रिया सोमवारी संपली असून या लिलाव प्रक्रियेत चार दूरसंचार कंपन्यांनी 1,50,173 कोटी रुपयांच्या स्पेक्ट्रमसाठी बोली लावली, जी सरकारच्या अंदाजापेक्षा खूप जास्त आहे. 5G स्पेक्ट्रमचा लिलाव 26 जुलै 2022 रोजी सुरू झाला, जो 7 दिवस चालला.

रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि अदानी डेटा नेटवर्क्स या कंपन्या 5G स्पेक्ट्रमच्या लिलावात सहभागी झाल्या आहेत. पहिले 6 दिवस चाललेल्या या लिलावात 1,50,153 कोटी रुपयांची बोली लागली. रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलने वेगवेगळ्या बँडमध्ये स्पेक्ट्रमसाठी आक्रमकपणे बोली लावली असल्याचे मानले जाते. दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, लिलावात ठेवलेल्या सर्व बँडसाठी चांगली स्पर्धा निर्माण झाली आहे. 2016 आणि 2021 मध्ये झालेल्या लिलावात या बँडसाठी कोणीही खरेदीदार नव्हता. मात्र, 5G स्पेक्ट्रम लिलावात लागलेली 1,50,173 कोटी रुपयांची बोली सरकारच्या स्वतःच्या अंदाजापेक्षा खूप जास्त आहे. तसेच, 2015 मध्ये लिलावातून मिळालेल्या 1.09 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी महसुलापेक्षा देखील ती अधिक आहे.

दरम्यान एकदा टेलिकॉम कंपन्यांना 5G स्पेक्ट्रम वाटप झाल्यानंतर ऑक्टोबर 2022 मध्ये देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये 5G मोबाइल सेवा सुरू होईल. मात्र, 5G मोबाइल सेवा सुरू झाल्यानंतर मोबाइल टेलिफोन आणि इंटरनेटचे जग बदलून जाईल असे बोललो जात आहे. 5G चा स्पीड 4G पेक्षा 10 पट जास्त असेल असे सांगितले जात आहे. 5G सेवा सुरू झाल्यानंतर ऑटोमेशनचे नवे पर्व सुरू होईल. ज्या गोष्टी आतापर्यंत मोठ्या शहरांपुरत्या मर्यादित होत्या, त्या खेड्यापाड्यांपर्यंत उपलब्ध होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: ‘आमदारगिरी’चा बनाव तरुणाच्या अंगाशी! पुण्यात ऑडीवर लावलं 'आमदार' स्टिकर, मद्यधुंद अवस्थेत कार पळवणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला घेतलं ताब्यात

Nandigram Express : नंदिग्राम एक्स्प्रेस चुकीच्या रुळावर लोको पायलटच्या सतर्कतेने अनर्थ टळला, किनवट स्थानकावर दोन तास खोळंबा

Latest Marathi News Update : मराठा समाजाला न्याय द्या, पण ओबीसींचे वाटोळे सरकारने केले विजय वडेट्टीवार यांचा घणाघात

Japan's Population: ११४ वर्षांच्या आजी अन् ११२ वर्षांचे आजोबा! काय आहे जपानमधील नागरिकांच्या दीर्घायुष्याचे रहस्य?

MPSC Success Story: एक एकर शेती, आई-वडिलांची मजुरी अन् पूजाची जिद्द; चौथ्या प्रयत्नात MPSC परीक्षेत महसूल सहाय्यकपदी यश, जिद्दीची यशोगाथा

SCROLL FOR NEXT