Tripura Rath Accident 
देश

Tripura Rath Accident: जगन्नाथ रथ यात्रेत मोठी दुर्घटना; वीजेच्या धक्क्याने 6 जणांचा मृत्यू, 10 पेक्षा अधिक जखमी

त्रिपुरा येथील जगन्नाथ रथ यात्रेत मोठी दुर्घटना घडली आहे.

धनश्री ओतारी

त्रिपुरा येथील जगन्नाथ रथ यात्रेत मोठी दुर्घटना घडली आहे. वीजेच्या धक्क्याने ७ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर १० पेक्षा अधिकजण जखमी झाले आहे. तर मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (6 dead, 15 injured as Rath comes in contact with high-tension wire)

त्रिपुरातल्या कुमारघाट इथं भगवान जगन्नाथ रथ यात्रेदरम्यान ही घटना घडली आहे. मिरवणूक सुरु असताना रथ एका उच्च दाबाच्या वीज तारेच्या संपर्कात आला. यामुळे करंट पसरला आणि त्याच्या धक्क्याने सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर पंधराहून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. अचानक घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

नेमकं काय घडलं?

त्रिपुरातील उनाकोटी जिल्ह्यातील कुमारघाट येथे साडेचारच्या दरम्यान घडली. कुमारघाट इथं भगवान जगन्नाथाची रथ यात्रा उत्सव साजरा केला जात होता. यात भगवान बलभद्र, देवी सुभद्रा आणि भगवान जगन्नाथ यांची रथ यात्रा मोठ्या उत्सहाता काढण्यात आली होती.

लोखंडाने बनलेला हा रथ हाजोर भाविक आपल्या हाताने खेचत नेत होते. याचदरम्यान, लोखंडाचा हा रथ रस्त्यातील हाय टेन्शन वायरच्या संपर्कात आला. यामुळे वीज रथात उतरली आणि अनेक जणांना वीजेचा धक्का बसला. यात सात भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर पंधरा जण होरपळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT