6 people shot dead during clash morena village in madhya pradesh know paan singh tomar connection  
देश

Morena Shootout : जमिनीच्या वादाचा रक्तरंजित शेवट! लागोपाठ पडले एकाच कुटुंबातील सहा मुडदे

रोहित कणसे

Morena Shootout News : मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यातील लेपा गावात शुक्रवारी सकाळी रक्तरंजित संघर्ष घडल्याने खळबळ उडाली आहे. लेपा गावातील धीरसिंह तोमर आणि गजेंद्रसिंह तोमर यांच्यात सुमारे १० वर्षांपासून जमिनीचा वाद सुरू आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी सहा जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे सर्व मृत एकाच कुटुंबातील होते.

मिळालेल्या माहितीनुसार या कुटुंबात यापूर्वीही रक्तरंजित संघर्ष झाला होता. ज्यामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान सध्या या गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच आरोपींचा शोध सुरू आहे. ज्या गावाची हत्या झाली त्या गावाला लागूनच भिडोसा गाव आहे. दोन्ही गावे जोडून ते लेपा-भिडोसा म्हणून ओळखले जाते. भिडोसा हे गाव पान सिंग तोमर यांचे गाव आहे.

या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, गावातील दोन कुटुंबांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. या हल्ल्यात ३ पुरुष आणि ३ महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जमिनीच्या वादानंतर पान सिंह तोमर यांनीही बंड केले होते. एकेकाळी सैन्यात असताना देशासाठी पदक मिळवून देणाऱ्या पानसिंग तोमर यांच्या जमिनीवर गुंडांनी अतिक्रमण केले होते. त्यानंतर पान सिंह तोमरने बंदूक उचलली. पान सिंग तोमर यांच्या शेजारच्या गावात झालेल्या या हत्याकांडानंतर पुन्हा एकदा लोकांना पान सिंग तोमरची आठवण येऊ लागली आहे. दिमानी विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र तोमर हे देखील भिडोसा गावचे रहिवासी आहेत.

गाव सोडून आरोपी फरार

घटनेनंतर आरोपी गाव सोडून फरार झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. लेपा गावात झालेल्या या रक्तरंजित संघर्षानंतर गावात दहशतीचे वातावरण आहे. दोन कुटुंबात २०१३ पासून वाद सुरू आहे. १० वर्षांपूर्वी झालेल्या रक्तरंजित संघर्षात धीर सिंग यांच्या कुटुंबातील दोन जणांचा मृत्यू झाला होता.

गजेंद्र सिंह यांच्या कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

शुक्रवारी झालेल्या या हत्याकांडात गजेंद्र सिंह यांच्या कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या भांडणाक एका बाजूने लाठीहल्ला करण्यात आला, त्यानंतर एक तरुण बंदूक घेऊन आला आणि त्याने गोळीबार सुरू केला. तरुणाने एकामागून एक अनेक राऊंड गोळीबार करून ६ जणांना ठार केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant: हा देश अंबानीच्या मुलाच्या वडिलांचा…; महादेवीसाठी कुणाल कामरा मैदानात, नव्या ट्विटनं पुन्हा अडचणीत येणार?

Yashasvi Jaiswal Century: जैस्वालची सुरुवात अन् शेवटही शतकाने! इंग्लंडच्या गोलंदाजांना चोपत मोठ्या विक्रमालाही घातली गवसणी

Jaykumar Gore : पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडचे नेते नसुन देशाचे नेते आहेत, त्यांनी केलेल वक्तव्य हे त्यांना उशीरा सुचलेले शहानपण

ENG vs IND: 'बुमराह असो वा नसो, आमचं काम...', प्रसिद्ध कृष्णा जस्सीच्या न खेळण्यावर नेमकं काय म्हणाला?

Latest Maharashtra News Updates Live: इगतपुरी शहरात शनिवारी दुपारी पोलीसांचा रुट मार्च

SCROLL FOR NEXT