देश

६ वर्षाच्या चिमुकलीने विचारला पंतप्रधानांना जाब; म्हणाली...

ऑनलाइन लेक्चर्समध्ये विद्यार्थी व पालक यांचे अनेक धम्माल किस्से घडत असतात

शर्वरी जोशी

गेल्या वर्षभरापासून देशावर कोरोनाचं (coronavirus) संकट आहे. हे संकट टाळण्यासाठी गर्दीची ठिकाणं टाळण्याचं आवाहनदेखील प्रशासनाकडून करण्यात येत आहे. यामध्येच कोरोनाचा संसर्ग टाळता यावा यासाठी शाळा व महाविद्यालयेदेखील बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र, मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाइन स्वरुपात त्यांचे लेक्चर्स सुरु आहेत. परंतु, या लेक्चर्समध्ये विद्यार्थी व पालक यांचे अनेक धम्माल किस्से घडत असतात. यापैकी अनेक मजेशीर किस्से आपण सोशल नेटवर्किंगवर पाहिलेदेखील असतील. सध्या अशाच एका चिमुकलीचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अभ्यास करुन करुन कंटाळलेल्या या चिमुकलीने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाब विचारला आहे. (6-year-old-kashmiri-girl-question-for-pm-modi-is-the-cutest-video-on-internet)

सध्या सोशल मीडियावर काश्मीरमधील एका ६ वर्षाच्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती ऑनलाइन क्लास आणि त्यानंतर देण्यात येणाऱ्या गृहपाठाविषयी पंतप्रधान मोदींकडे तक्रार करतांना दिसत आहे. सोबतच लहान मुलांना इतका अभ्यास का?, असा प्रश्नही तिने पंतप्रधानांना विचारला आहे.

"दररोज सकाळी मला १० ते १२ वाजेपर्यंत ऑनलाइन क्लासला बसावं लागतं. इंग्रजी, गणित, उर्दू, पर्यावरण, कंप्युटर अशा अनेक विषयाच्या लेक्चर्सला मला ऑनलाइन माध्यमातून हजेरी लावावी लागते. त्यानंतर घरचा अभ्यासही करावा लागतो", असं ही मुलगी या व्हिडीओमध्ये सांगत आहे.

पुढे ती म्हणते, “बडे बच्चे जो सातवी आठवी मे हैं उन्हें जादा होमवर्क देना चाहिऐ. “छोटे बच्चो को इतना काम क्यूँ रखते हो मोदी साब?”.

दरम्यान, या चिमुकलीने विचारलेला प्रश्न पाहून अनेकांना हसू अनावर झालं आहे. तर, काहींनी खरंच या मुद्द्यावर लक्ष दिलं पाहिजे असंही म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT