Viral Video Esakal
देश

Viral Video: धक्कादायक! घरातून उचलून नेत अल्पवयीन मुलीवर ऑन कॅमेरा बलात्कार करण्याचा प्रयत्न अन्...

अल्पवयीन मुलीला घरातून उचलून नेत तिच्यावर सामूहिक बलात्काराचा प्रयत्न केला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्याच्या मच्छली शहराच्या रसूलाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक संतापजनक घटना समोर आली आहे. सहा पुरुषांनी एका अल्पवयीन मुलीला तिच्या घरातून पळवून नेत तिच्यावर ऑन कॅमेरा बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीने आरडाओरड करत आरोपींच्या तावडीतून स्वत:ची सुटका करुन घेतली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये चार जण अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करताना दिसत आहे. पीडित मुलगी स्वत:चा बचाव करत आहे. तरीही आरोपी जबरदस्ती करताना दिसत आहेत. पीडितेने आरोपींचा प्रतिकार केला असता आरोपींनी तिचे हात मुरडत तिच्यावर शारीरिक हल्ला केला.

यानंतर पीडित मुलीने आरडाओरडा करत आरोपींच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली आणि घटनास्थळावरून पळ काढला आहे. यावेळी एक आरोपी संपूर्ण घटना मोबाईलमध्ये कैद करत होता. हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मुलगी आरडाओरडा करत असताना तिचा आवाज ऐकून लोक मदतीला येतील या भीतीने सहाही आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रसूलाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे. ही घटना १४ ऑगस्ट रोजी रात्री घडली आहे, याबाबतची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT