right to information bill in rajyasabha  
देश

पेगॅससवर चर्चा का नाही? गदारोळामुळे राज्यसभेचे ६० तास वाया

विनायक होगाडे

नवी दिल्ली : यंदा संसदेचं पावसाळी अधिवेशन अनेक मुद्यांमुळे चांगलंच गाजलेलं दिसून आलं. पेगॅसस हेरगिरी प्रकरणावर चर्चा व्हावी, या मागणीसाठी विरोधकांनी पूर्ण बाजी लावलेली दिसून आली. विरोधी पक्षाला पेगॅससवर चर्चा हवी आहे, मात्र सरकार त्यावर चर्चा करण्यास तयार नसल्याचं दिसून आलं. त्याखालोखाल कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ विरोधात एकवटलेले दिसून आले. सततच्या गदारोळामुळे सभापतींना सातत्याने अधिवेशन तहकूब करावं लागल्याचं दिसून आलं. यामुळे सरकारने पटलावर आणलेल्या आणि आणू इच्छित असलेल्या अनेक कायद्यांवर पुरेशी चर्चा झाली नाही. मात्र, असं असलं तरीही सरकारने अनेक विधेयकं मांडल्याचं दिसून आलं.

संसदेचे पावसाळी अधिवेशन गदारोळातच संपण्याची चिन्हे असताना अनेक विधेयक या अधिवेशनात संमत करण्यात आली आहेत. राज्यसभेत तिसऱ्या आठवड्यात आठ विधेयके संमत झाल्याने या अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्यातील राज्यसभेच्या कामकाजाची उत्पादकता २४ टक्क्यांनी वाढली आहे. या आठवड्यात सतरा पक्षांच्या ६८ खासदारांनी आठ विधेयकावर चर्चा केल्याचे राज्यसभेच्या गोटातून सांगितले जात आहे. राज्यसभेच्या पहिल्या तीन आठवड्यात विविध मुद्द्यांवरून गदारोळ झाले. त्यात सभागृहाच्या कामकाजाच्या ७८ तासांपैकी साठ तास वाया गेले आहेत. राज्यसभेत पहिल्या दोन आठवड्यात एक तास ३८ मिनिटे प्रश्‍नोत्तराचा तास चालला. गेल्या आठवड्यात सभागृहाची उत्पादकता १३.७० टक्के होती. या आठवड्यात ती ३२.२० टक्क्यांपर्यंत वाढली आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT