Corona Update 
देश

भारतात एका दिवसात तब्बल ०४ लाख ७७ हजार २३ कोरोना चाचण्या; तर...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारतातील कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्या कमी होताना दिसत नाही. सलग तिसऱ्या दिवशी भारतात ६० हजारांपेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. अशात एक दिलासादायक बाब म्हणजे देशात कोरोना चाचण्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काल (ता. ०९) एका दिवसात भारतात एकूण ०४ लाख ७७ हजार २३ कोरोना चाचण्या झाल्या आहेत. देशात आतापर्यंत एकूण ०२ कोटी ४५ लाख ८३ हजार ५५८ कोरोना चाचण्या झाल्या आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

काल झालेल्या कोरोना चाचण्यात एकूण ६२ हजार ६४ नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. भारतात आता एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २२ लाख १५ हजार ७४ झाली आहे. गेल्या २४ तासांत भारतात एकूण १००७ कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, ४४ हजारांपेक्षा जास्त लोकांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

भारतात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे आता ६९.३३ टक्क्यांवर पोहोचले असून ही सकारात्मक बाब आहे. भारतात आतापर्यंत १५ लाख ३५ हजार ७४३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. भारतातील पॉजिटिव्हिटी रेट १३.०१ टक्के असून भारतात पहिले एक लाख रुग्ण होण्यासाठी तब्बल ११० दिवसांचा कालावधी लागला होता. मात्र, आता २२ लाखांपेक्षा जास्त रुग्ण केवळ १९३ दिवसांत झाले आहेत. ८३ दिवसांत २१ लाखांहून अधिक रुग्णांची भर पडली आहे. आरोग्य खात्याच्या आकडेवारीनुसार भारतात मागील सात दिवसांपासून जगातील सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद होत आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार देशात कोरोना चाचण्यांची संख्या वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात आकडे वाढत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara: कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार! धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक; १२ तासात ७८७ मिमी पाऊस

Cabinet Reshuffle: ते दोन केंद्रीय मंत्री कोण? भाजप कार्यालयात पोहोचताच राजीनाम्याच्या चर्चांना उधाण

Marathi Live Updates : नागपूरात घरातून एक-दोन नव्हे, तब्बल चाळीस नागांची पिल्ले; परिसरात उडाली भीती, Video पाहा

नागपुरात एकाच कुटुंबातील ५ जण बेपत्ता, शेवटचं लोकेशन पुणे; १० दिवसांपासून शोध सुरू

Ketan Agrawal Case : पुण्यातील लोहगड केतन अग्रवाल प्रकरणानंतर 'राष्ट्रीय पुरुष आयोग' स्थापन होणार?, राज्यसभेत पडसाद; भाजप खासदारांकडून मागणी

SCROLL FOR NEXT