Cruise 
देश

'त्या' क्रूझवर 66 पॉझिटीव्ह; एकट्यापायी 2 हजारांना थांबवण्याचा निर्णय ठरला योग्य

सकाळ डिजिटल टीम

गोवा: ओमिक्रॉनचं सावट गडद झाल्यापासून देशात पुन्हा एकदा रुग्णवाढीचा सिलसिला सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन अत्यंत सतर्क झालं आहे. राज्यात काल रविवारी तब्बल ५० रुग्ण ओमिक्रॉनबाधित (Omicron) सापडले आहेत. त्यातील ३६ रुग्ण हे एकट्या पुण्यातले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर काल एक अशी बातमी समोर आली होती, जी ऐकून तुम्ही हैराण झालेला असाल. मुंबईहून गोव्याला निघालेल्या कॉर्डेलिया एम्प्रेस क्रूझच्या एका क्रू सदस्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या एका सदस्यापायी आता सगळ्या प्रवाशांना थांबावं लागलं होतं.

आता गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉर्डेलिया क्रूसी जहाजातून 2000 लोकांची चाचणी घेण्यात आली. त्यापैकी 66 प्रवासी हे कोरोना पॉझिटीव्ह सापडले आहेत. या प्रवाशांना जहाजातून प्रवाशांना उतरवण्याची परवानगी द्यायची की नाही याचा निर्णय अधिकारी घेतील, असं त्यांनी स्पष्ट केलंय.

या क्रूझमध्ये एकूण 2017 लोक होते. एक प्रवासी पॉझिटीव्ह आल्यामुळे आता उर्वरित 2016 लोकांची RT-PCR चाचणी करण्यात आली होती. त्यांच्या अहवालानंतरच त्यांना क्रूझमधून उतरण्याची परवानगी दिली जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. सध्यातरी पॉझिटिव्ह आलेल्या त्या पहिल्या क्रू मेंबरला SOPs नुसार सुविधेत हलवण्यात आलं आहे.

ही क्रूझ सध्या मुरगाव बंदरात आहे. आरटीपीसीआर चाचणीशिवाय कोणीही जहाजातून उतरू नये, अशा कडक सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. या लोकांच्या चाचण्या घेण्यासाठी एक वैद्यकीय पथक पीपीई किटसह जहाजावर गेले होते. या जहाजात सुमारे 2000 प्रवासी आणि 13 क्रू मेंबर्स होते. एका सदस्यापायी सगळेच सध्या क्रूझवर अडकून राहिलं आहे. त्यानंतर आता सुमारे 66 जण पॉझिटीव्ह आढळले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

IND vs PAK सामन्यानंतर वातावरण तापलं; सूर्या अन् हार्दिक कुलदीप यादववर भडकले, नेमकं काय घडले; पाहा Viral Video

5G च्या नावाखाली तुमची फसवणूक तर होत नाहीये ना? घरबसल्या 'इथून' चेक करा तुमच्या एरियातलं नेटवर्क

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

Central Railway: शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ, आरक्षण सुरू; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT