mask esakal
देश

67% भारतीयांना का हवेत मोफत N95 मास्क? सर्वेक्षणातून माहिती समोर

सकाळ डिजिटल टीम

कोरोना व्हायरसच्या (coronavirus) पार्श्वभूमीवर भारतातील मास्कची (india) अत्यावश्यकता आणि वापराबाबत केलेल्या सर्वेक्षणात (survey) धक्कादायक माहिती समोर आली आहेत. घराबाहेर पडताना दर तीनपैकी एक भारतीय मास्क (mask) घालून बाहेर पडत नसल्याचे समोर आले आहे. तर, तीनपैकी दोन भारतीय कापडी मास्क वापरतात, जे कोरोना संसर्ग टाळण्यासाठी योग्य मानले जात नाहीत.

अमेरिकेप्रमाणेच 67 टक्के भारतीयांचे मत

LocalCircle ने केलेल्या या सर्वेक्षणात असे समोर आले आहे की, अमेरिकेप्रमाणेच 67 टक्के भारतीयांचे मत आहे की, भारत सरकारने N95 मास्क मोफत उपलब्ध करून देण्याची मोहीम सुरू करावी. सर्वेक्षणात 9,902 प्रतिसाद प्राप्त झाले, ज्यामधून असे दिसून आले की N95/KN95/FFP2 मास्क सार्वजनिकरित्या उपलब्ध करून दिले पाहिजेत.

अमेरिकेने सुरू केले अभियान

अमेरिकेत मास्कची गरज लक्षात घेऊन मोहीम सुरू करण्यात आली आहे. सामुदायिक आरोग्य केंद्रांवर 400 दशलक्ष N95 मास्क मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली. त्या दरम्यान मास्कच्या आवश्यकतेवर भर देत असल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर अनेक राज्ये विनामास्क दंडातही वाढ करताना दिसत आहेत.

एन-95 मास्क सुरक्षित असल्याचे तज्ञ सांगतात

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या काळात, तज्ञांचे म्हणणे आहे की संसर्ग टाळण्यासाठी फक्त N-95 किंवा KN-95 मास्कच योग्य आहेत. सर्जिकल मास्क हे COVID-19 संसर्गाविरूद्ध मर्यादित संरक्षण करतात असे मानले जाते. त्याच वेळी, सर्वात धोकादायक कापडी मास्क आहेत, ज्यापासून कमी संरक्षण मिळते.

N-95 मास्क सुरक्षित का आहे ते जाणून घ्या

LocalCircle द्वारे Omicron संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चाचणी करण्यात आली. या अंतर्गत एकाच घरात दोन व्यक्तींना (एक ओमिक्रॉन संक्रमित आणि दुसरा कमकुवत प्रतिकारशक्ती असलेला) सहा फूट अंतरावर ठेवण्यात आले होते. या चाचणीमध्ये असे आढळून आले आहे की जर घरातील दोन्ही लोकांनी एन-95 मास्क वापरला तर तीन तास ते 24 तासांत एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होतो. तर, संक्रमित व्यक्तीपासून ते निरोगी व्यक्तीपर्यंत, जर त्याने मास्क घातला नसेल किंवा कापडाचा मास्क घातला असेल, तर संसर्ग पोहोचण्यासाठी फक्त दोन मिनिटे लागतात. तर सर्जिकल मास्कमध्ये कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तीला चार मिनिटे लागतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Main Exam 2026 Postponed : MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 3 ऑक्टोबरपासून होणाऱ्या तीन महत्त्वाच्या मुख्य परीक्षा ढकलल्या पुढे; आयोग लवकरच जाहीर करणार नव्या तारखा

Jammu-Kashmir Assembly: जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा? विधानसभेत ठराव मंजूर, भाजपचा सभात्याग! काय बदल होणार?

Ladki Bahin Yojana ₹1500 Installment : लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 ऐवजी किती पैसे जमा झाले? घरबसल्या मोबाईलवर मिनिटांत तपासा रक्कम; कशी पाहाल स्टेटस?

Latest Marathi News Live Update: ९० कोटींच्या निविदेसाठी आयुक्तांना धमकी

Udaipur ₹2 Crore Bribery Case : एसीबीच्या जाळ्यात सापडला मोठा मासा? तब्बल 2 कोटी रुपयांची घेतली लाच; एसओजी अधिकाऱ्याच्या नावाने पैसे घेणारा दलाल जाळ्यात

SCROLL FOR NEXT