देश

Gujrat Family Suicide: धक्कादायक! सूरतमध्ये एकाच कुटुंबातील ७ जणांची आत्महत्या; 3 मुलांचाही समावेश

दिल्लीतील बुरारी आत्महत्या प्रकरणाची यामुळं आठवण होते. या कुटुंबातील ११ सदस्यांनी आत्महत्या केली होती.

Amit Ujagare (अमित उजागरे)

सूरत : दिल्लीतील बुरारी आत्महत्या प्रकरणाची आठवण करुन देणारी घटना गुजरातमधील सूरत इथं घडली आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील ७ जणांनी आत्महत्या केली आहे, यामध्ये तीन बालकांचाही समावेश आहे.

या प्रकरणामुळं देशात खळबळ उडाली आहे. शनिवारी सकाळी या कुटुंबानं लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमुळं ही घटना उघडकीस आली. (7 members of family die by suicide in Gujarat Surat note recovered)

सुसाईड नोटमधून खुलासा

पोलिसांच्या माहितीनुसार, मृतांमध्ये मनिष सोलंकी, त्यांची पत्नी रीता सोलंकी, वडील कानू सोलंकी, आई शोभा सोलंकी आणि दिशा, काव्या आणि कुशल नामक तीन मुलांचा समावेश आहे. यांपैकी ६ जणांची विष खाल्यानं तर एकानं फाशी घेऊन आत्महत्या केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आलं आहे. (Latest Marathi News)

आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोटही या कुटुंबानं लिहून ठेवली आहे. प्राथमिकदृष्ट्या यामागे आर्थिक कारण असू शकतं अशी माहिती सूरतचे पोलीस उपायुक्त राकेस बरोट यांनी दिली आहे. (Marathi Tajya Batmya)

सात जणांचा मृत्यू

मनीष सोलंकी यांचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तर इतर सर्वजणांचा मृत्यू विष खाल्यानं झाला आहे. यावरुन मनीषनं आधी कुटुंबातील सर्वांना विष दिलं त्यानंतर त्यानं स्वतः पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. (Latest Marathi News)

कर्मचाऱ्यामुळं घटना उघडकीस

मनीषचा फर्निचरचा बिझनेस होता तसेच त्याच्यासोबत ३५ कर्मचारी काम करत होते. शनिवारी त्याच्या कर्मचाऱ्यांनी त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला पण मनीषनं फोन उचलला नाही. त्यामुळं तो मनीषच्या भेटण्यासाठी गेला. यावेळी घराचा दरवाजा बंद होता.

यावेळी शेजारच्या लोकांनी घराचा दरवाजा तोडला आणि ते घरात घुसले. त्यानंतर समोर भयंकर दृश्य पाहून सर्वांना धक्काच बसला. या कुटुंबातील सर्वांचे मृतदेह घरात होते. यानंतर पोलिसांनी घरात प्रवेश केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. तसेच पुढील चौकशी करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिषेक

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

SCROLL FOR NEXT