Agriculture Minister Narendra Singh Tomar income farming family 
देश

मोठी बातमी! राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून 700 कोटींची मदत

विनायक होगाडे

नवी दिल्ली : महाराष्ट्रात सध्या पुरानं थैमान घातलं आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक तसेच जीवित हानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकाने आता मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ही मदत असणार आहे. कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना आज मंगळवारी राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही मदत जाहीर केली आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी जवळपास ७०० कोटी मंजूर केले असल्याची माहिती दिली आहे. याबाबतचं वृत्त 'हिंदूस्थाना टाईम्स'ने दिले आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी देखील विरोधी पक्षाने सभागृहात गोंधळ घातल्यामुळे कामकाज स्थगित करावं लागलं. सभापती ओम बिर्ला यांनी विरोधकांना वारंवार कार्यवाहीत सहभागी होण्याचं आवाहन केलं मात्र, प्रश्नोत्तराचा तास खूप वेळा तहकूब करावा लागला. त्यानंतर दुपारी ४ वाजता सभागृहाचं कामकाज सुरु करण्यात आलं.

या सगळ्या गोंधळाच्या परिस्थितीमध्येच केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी महाराष्ट्रात सध्या आलेल्या पुराबद्दल वक्तव्य केलं. त्यांनी म्हटलं की, नुकत्याच आलेल्या पूरामुळे, विशेषत: शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा सखोल अहवाल आम्हाला मिळाला आणि त्याचं विश्लेषण केलं गेलंय. यानंतर या पूरामधील पीडित शेतकऱ्यांसाठी गृह मंत्रालयाने ७०० कोटीं रुपये मदत म्हणून मंजूर केले आहेत, ” अशी माहिती तोमर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT