75% of 4.5 lakh TCS employees to permanently work from home by 25 from 20% 
देश

कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी टीसीएसचे पाऊल; पुढील पाच वर्षासाठी घेतला 'हा' निर्णय

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव देशात मोठ्या प्रमाणात वाढत असून तो रोखण्यासाठी जगभरात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे सर्वच देशांची अर्थव्यवस्था ठप्प झालीय. अशावेळी अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी देशाअंतर्गत काही कामांना परवानगी देण्यात आली आहे. यावेळी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी भारतातील नामांकित कंपनी टीसीएसने कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

टीसीएसने आपल्या कर्मचाऱ्यांपैकी केवळ २५ टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालयात येऊन काम करण्याची परवानगी आहे. तर, इतर ७५ टक्के कर्मचाऱ्यांना घरुनच काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोरोना संकट आल्यानंतर जगभरातील अनेक समीकरणं बदलली आहेत. लोकांच्या जीवनशैलीत देखील महत्वाचे बदल झाले. सर्वजण स्वच्छतेबाबत जागरुक झाले आहेत.

व्यापारी म्हणतायेत, तासभर तरी दुकाने उघडण्यास परवानगी द्या...

कोरोनाच्या या संकटाला तोंड देताना वर्क फ्रॉम होम ही संकल्पना देखील जगभरात रुजू लागली. भारतात टीसीएसने मोठा निर्णय घेऊन याची मुहूर्तमेढ रोवली. टीसीएसमध्ये सध्या ३ लाख ५५ हजार कर्मचारी काम करत आहेत. यातील २.६ लाख कर्मचारी वर्क फ्रॉम होम करु शकणार आहेत. हा निर्णय केवळ लॉकडाऊनपुरता मर्यादित नसेल. तर पुढच्या पाच वर्षांसाठी राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

दगडाने ठेचून युवकाचा खून; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

२०२५ पर्यंत टीसीएसचे ७५ टक्के कर्मचारी वर्क फ्रॉम होम करतील. दरम्यान, या संकल्पनेला किती यश मिळालं? याची तपासणी होईल आणि पुढचा निर्णय ठरवण्यात येईल. टीसीएसमध्ये राबवण्यात येत असलेल्या या संकल्पनेला मॉडेल-२५ असं नामकरण करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT