
Latest Marathi Live Update News
esakal
दसरा मेळावा नारायण गडावर परंपरेप्रमाणे होणार आहे. कितीही संकट असलं तरी प्रत्येकजण नारायणगडावर दर्शनाला येतच असतात. यावर्षीही राज्यभरातून बांधव नारायण गडावर येतायत. १२ वाजता दसरा मेळावा सुरू होणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली. आजच्या दिवशी एकमेकाला वाईट बोलण्याची भावना नसायला पाहिजे. संकटातून शेतकर्यांना बाहेर काढण्यासाठी आपण एकजूट झालं पाहिजे असंही जरांगे पाटील म्हणाले.