narendra modi 
देश

कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी योजना आणणार- पंतप्रधान मोदी

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- लाल किल्ल्यावर झेंडा फडकावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी छोट्या शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली. देशात आज ८० टक्क्यांपेक्षा अधिक शेतकऱ्यांकडे २ हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. ही देशासाठी चिंतेची बाब आहे. त्यामुळे कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लवकरच विशेष योजना आणली जाणार असल्याचं मोदी म्हणाले आहेत. ( 75th independence day Latest News)

देशात 80 टक्क्यांपेक्षा अधिक शेतकऱ्यांकडे 2 हेक्टर पेक्षा कमी जमीन आहे. सुरुवातील देशांमध्ये ज्या नीती बनल्या त्या छोट्या शेतकऱ्यांना केंद्र स्थानी ठेवून बनल्या नाहीत. त्यामुळे त्यांना लक्षात घेऊन एक निर्णय घेतला जाणार आहे. छोटा शेतकरी देशाची शान बनावा असा आपला संकल्प असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

'छोटा किसान बने देश की शान' हा आपला नारा आहे. हे आपले स्वप्न आहे. येत्या काळात आपण शेतकऱ्यांची सामूहिक शक्ती वाढवणार आहोत. शेतकऱ्यांना नव्या सुविधा पुरवल्या जातील. किसान रेल सध्या देशातील 70 पेक्षा अधिक रेल्वे मार्गावरुन धावत आहे, असं मोदी म्हणाले. आपण पाहतोय की आपले गाव बदलत आहेत. गेल्या काही वर्षात वीज, रस्ते गावात पोहोचले आहेत. सध्या ऑपटिकल फायबर महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. इंटरनेट गावात पोहोचले आहे. डिजिटल उद्योजक आता गावातही तयार होत आहेत, असं मोदी म्हणाले.

भारत सहकारवादावर भर देत आहे. आपल्या परंपरेला ते अनुकूल आहे. 8 कोटींपेक्षा अधिक महिला सेल्फ हेल्प ग्रुपशी जोडल्या गेल्या आहेत. त्यांसाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म तयार करण्यात येणार आहे. या प्लॅटफॉर्ममुळे त्यांच्या वस्तू देशभरात पोहोचवण्यासाठी मदत होईल, असं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT