narmda river
narmda river google
देश

'नर्मदा आरती'वर ७७ लाखांची उधळपट्टी, माहितीच्या अधिकारात बाब उघड

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे (south central zone cultural center) जबलपूर (मध्यप्रदेश) (jabalpur MP) येथे आयोजित करण्यात आलेल्या नर्मदा आरती (narmada aarati) कार्यक्रमावर ७७ लाख रुपयांची उधळपट्टी केल्याची बाब माहिती अधिकारातून पुढे आली आहे. एकीकडे लाखो रुपयांची उधळपट्टी होत असताना दुसरीकडे सांस्कृतिक केंद्रातर्फे जनजागृती होत नसल्याने इतर राज्यातील कलावंत उपेक्षित राहत आहेत. (77 lakh rs spent on narmada aarati by south central zone cultural center)

माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारात केंद्राकडे अर्ज करीत विविध प्रश्‍न केले होते. यामध्ये, एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या काळामध्ये झालेला खर्च आणि कार्यक्रमांविषयी माहिती देण्यात आली आहे. त्यात मोठ्या दिमाखात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ६ मार्च रोजी नर्मदा नदीची करण्यात आलेल्या आरतीचा सुद्धा उल्लेख आहे. तर, केंद्रातर्फे वर्षभरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या इतर १८८ विविध कार्यक्रमांवर ३.७९ कोटी रुपये खर्च झाले झाले आहेत.

इतका खटाटोप करून काही मोजके क्षेत्र सोडल्यास इतर जिल्ह्यातील कलावंतांना स्थान मिळत नसल्यास केंद्राचे फलित काय? असा प्रश्‍न उपस्थित होतो. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा असे सहा राज्य केंद्राच्या अखत्यारीत येतात. केंद्र शासनातर्फे या राज्यातील विविध कलांची जोपासना व्हावी आणि कलावंतांना स्थान मिळावे यासाठी या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, सांस्कृतिक केंद्राला आपल्या उद्देशांचा विसर पडल्याचे पाहायला मिळत आहे. कलावंतांना सहभाग घ्यायचा असल्यास केंद्राच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध असल्याचे सांस्कृतिक केंद्राच्या संचालकांनी सांगितले. मात्र, या विषयी केंद्रातर्फे जनजागृती होत नाही.

''आरतीच्या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन केंद्राने केले होते. कार्यक्रमात १४ हायप्रोफाईल मान्यवरांचा सहभाग होता. रोषणाई आणि पार पडलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांवर ७७ लाख रुपये खर्च करण्यात आले.''

-डॉ. दीपक खिरवाडकर, संचालक, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र.

प्रमुख कार्यक्रमावर केलेला खर्च (रुपयांमध्ये)

  • नर्मदा आरती कार्यक्रम (जबलपूर) - ७७ लाख ८१ हजार ३७१

  • कोरोनावर जनजागृती (जबलपूर, म. प्र.) - ४४ लाख ५२ हजार ८३९

  • राष्ट्रीय संस्कृती महोत्सव (वेस्ट बंगाल) - ३० लाख २८ हजार ६७२

  • सांस्कृतिक कार्यक्रम (संग्रामपुर, म. प्र.) - १३ लाख २७ हजार ९०३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिकने जिंकला टॉस! मुंबईकडून 'या' खेळाडूचे पदार्पण, तर हैदराबाद संघातही मोठा बदल; पाहा प्लेइंग-11

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Disha Patani : दिशाच्या बिकिनी लुकचा सोशल मीडियावर धुमाकूळ; फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT