देश

चिंतामणीमध्ये जीपची ट्रकला धडक, आठ जणांचा जागीच मृत्यू

नामदेव कुंभार

कर्नाटकमधील चिक्कबळापूर जिल्ह्यातील चिंतामणी तालुक्यातील मरिनायकनहळी गेटजवळ भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि जीप यांच्यात झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दहापेक्षा जास्त जणा गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघात इतका भीषण होता की जीपचा चुराडा झाला आहे. या भीषण अपघातांमध्ये मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जीपची ट्रकला धडक झाल्यामुले भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जणांचा उपचारावेळी मृत्यू झाला आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृताची संख्या आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. काही जखमींवर कोलार एसएनआर रुग्नालयात उपचार सुरु आहेत. तर गंभीर जखमींना बेंगळुरुमधील रुग्नालयात हलवण्यात आलं आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. चिंतामणी ग्रामीण पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी चालकाला अटक केली आहे.

श्रीनिवासपुराचे आमदार रमेशकुमार, मलुरचे आमदार के.वाय नांजे गोवडा आणि चिंतामणीचे आमदार कृष्णा रेड्डी यांनी घटनास्थळाला भेट दिली. रस्त्याचं काम सुरु होतं त्याठिकाणी हा भीषण अपघात झाला. या भीषण अपघताची दृश्ये अंगाचा थरकाप उडवणारी आहेत.अपघातग्रस्त जीपमध्ये चालकासह 17 जण प्रवास करत होतं. त्यामुळे चालकाचं नियंत्रण सुटल्याचा दावा करण्यात आला आहे. प्रवासी वाहतूकीसाठी जीपचा वापर सर्रास केला जातो. पोलिसांनी त्यावर आतापर्यंत कधीही कारवाई केली नाही अथवा साधी तपासणीही केली नाही, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. पोलिसांनी जीप चालकाला अटक केली असून चौकशी सुरु करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MP Train Accident : एक्सप्रेसमध्ये आगीची अफवा पसरताच प्रवाशांच्या रुळावर उड्या, दुसऱ्या ट्रेनने अनेकांना चिरडले; ५ जणांचा जागीच मृत्यू

T20 WC, IND W vs PAK W, Playing XI: हरमनप्रीत कौरने टॉसही जिंकला, पण पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन केलं की नाही?

US Iran Deal: अमेरिका-इराण कराराचा मोठा मसुदा तयार! होर्मुज स्ट्रेट खुले होणार; तेलबंदी हटणार, डीलमध्ये काय ठरलं?

Latest Live Updates Marathi: बंडखोर टीएमसी नेत्यांनी घेतली केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट

Waste Management: उरुळी कांचनमध्ये अत्याधुनिक घनकचरा प्रकल्पाला गती; देवस्थानकडून दोन एकर जागा

SCROLL FOR NEXT