देश

EV गाड्यांमधील आगीच्या घटना थांबेना; 80 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

हैदराबाद : देशभरातील एकीकडे वाढत्या इंधन दराच्या वाढीमुळे अनेकांचा कल इलेक्ट्रिक गाड्या (Electrical Vehicle) विकत घेण्याकडे वाढला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये या गाड्यांमध्ये लागणाऱ्या आगीच्या घटनांमुळे काहीसे चिंता व्यक्त केली जात आहे. तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यात एका घरात चार्जिंगल लावलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या डिटॅचेबल बॅटरीचा स्फोट होऊन भडकलेल्या आगीमध्ये एका 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जण जखमी झाले आहेत. दरम्यान, इलेक्ट्रिक गाड्यांच्या अशा प्रकारच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पोलिसांनी प्युअर ईव्ही या निर्मात्याविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. (EV Bike Accident News)

याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी रात्री रामास्वामी नावाच्या व्यक्तीने त्यांची इलेक्ट्रिक बाईक बॅटरी चार्जिंगसाठी लावली होती. त्यावेळी अचानक बॅटरीचा स्फोट झाला आणि आग लागली. यामध्ये भाजल्याने 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. तर रामास्वामी यांचा मुलगा प्रकाश, पत्नी कमलम्मा आणि सून कृष्णवेणी हे रामास्वामी यांना वाचवताना जखमी झाले. रामास्वामी यांचा मुलगा प्रकाश Pure EV कंपनीची स्कूटर वर्षभरापासून वापरत होता.

घटनेबद्दल कंपनीकडून खेद व्यक्त

दरम्यान, घटनेत मृत्यू झालेल्या घटनेनंतर संबंधित उत्पादक कंपनीने घडलेल्या घटनेबद्दल मनापासून खेद व्यक्त केला आहे. तसेच कंपनीच्या डेटाबेसमध्ये वापरकर्त्याने या वाहनाची किंवा सेवेची खरेदी केल्याची कोणतीही नोंद नाही. त्यामुळे संबंधित व्यक्तीने हे वाहन सेकंड हँड खरेदी केले गेले आहे का? याचा तपास केला जात आहे.

"...तर कंपन्यांना मोठा दंड ठोठावला जाईल"; नितीन गडकरींची मोठी घोषणा

गेल्या दोन महिन्यांत देशभरात इलेक्ट्रिक स्कूटर्सनी पेट घेण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत हे लक्षात घेऊन, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी घटनांची चौकशी करण्यासाठी तज्ञांची समिती स्थापन करण्यात आल्याचे सांगितले, तसेच इलेक्ट्रिक वाहनांच्या गुणवत्तेबाबत लवकरच मार्गदर्शक तत्वे जारी केली जातील, त्यासोबतच निष्काळजीपणा करणाऱ्या कंपन्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल असेही केंद्रिय मंत्री गडकरी यांनी सांगितले. गडकरी यांनी ट्विट करत, गेल्या दोन महिन्यांत इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांच्या अनेक दुर्घटना उघडकीस आल्या आहेत. या घटनांमध्ये काही लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत हे सर्वात दुर्दैवी आहे, असे म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Latest Marathi News Live Update : नसीम खान असणार काँग्रेसचे स्टार प्रचारक

SCROLL FOR NEXT