Saibaba temple shirdi Esakal
देश

Shirdi : भाविकाकडून साईबाबा मंदिराला 33 लाखांचा हिरेजडित सोन्याचा मुकुट दान

शिर्डीच्या साईबाबांच्‍या खजिन्‍यात आणखी एका सोन्‍याच्‍या अमेरिकन डायमंड जडीत मुकुटाची भर पडली आहे.

सकाळ डिजिटल टीम

शिर्डीच्या साईबाबांच्‍या खजिन्‍यात आणखी एका सोन्‍याच्‍या अमेरिकन डायमंड जडीत मुकुटाची भर पडली आहे. हैद्राबाद येथील साईभक्त डॉ. रामकृष्णा यांनी आपल्या धर्मपत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी सुमारे 33 लाख रुपयांचा सुवर्ण मुकट साईबाबांच्या चरणी अर्पण केला आहे.

हा मुकूट नेमका कसा आहे ?

शिर्डीच्या साईबाबांना दान स्वरुपात मिळालेला मुकूट अतिशय सुंदर रेखीव आणि आकर्षक आहे. मुकुटावर अमेरिकन डायमंडचा साज चढवण्यात आला असून, त्यावर ओम या नावाची छबी रेखाटण्यात आली आहे. आणि मुकूटाच्या वरच्या भागाला मोरपिसाने सजवण्यात आलं आहे. या मुकूटाच वजन 742 ग्रॅम असल्याचं सांगितलं जात आहे. तर किंमत सुमारे 33 लाख रुपये आहे.हा मुकूट हैद्राबाद येथील एका कुशल कारागीराकडून बाबा तयार करुन घेतला आहे.असे डॉ. रामकृष्णा यांनी सांगितलं आहे.

पुढे ते सांगतात की, 1992 साली मी आणि माझी धर्मपत्नी शिर्डीला साईबाबा दर्शनसाठी आलो होतो. यावेळी आरतीदरम्यान मुकूट चढवत असल्याचा तो सोहळा माझी धर्मपत्नी रत्नाम्मा यांनी पाहिला. तेव्हाच त्यांनी मला पण साईबाबांना असाच सोन्याचा मुकूट चढवण्याची इच्छा व्यक्त केली. पण त्यावेळी ते आमच्या परिस्थितीच्या अभावी शक्य झालं नाही.

दरम्यानच्या पुढच्या काही काळातच दुदैवाने रत्नाम्मा यांचं निधन झालं. मात्र मला माझ्या पत्नीची शेवटची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. डॉ. रामकृष्णा म्हणाले, 'साईबाबांच्या इच्छेपुढे काहीच नसतं, आज वयाच्या 88 व्या वर्षी पत्नीची इच्छा पूर्ण करताना खूप आनंद होत आहे. तिनं मागितलेलं हे मागणं मी पूर्ण करत आहे.हा मुकूट खरेदी करण्यासाठी मी सेवानिवृत्तीनंतर सलग 15 वर्षे अधिक काम करुन पैसे एकत्र करुन हा मुकूट घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET ते TET... 2024 मध्येच कायदा आला, तरी पेपरफुटी थांबली नाही; सरकारकडे उत्तर आहे का? नवीन कायदा कशासाठी? Fact Explained...

Gokul Politics : गोकुळ दूध संघात नवा ट्विस्ट! 'त्या' सहानुभूतीवरून शौमिका महाडिक यांच्यावर 410 सभासदांचा घणाघात; कोल्हापूरच्या राजकारणात नक्की काय घडतंय?

Latest Marathi News Live Update : शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी लोकसभेत विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी

Rojgar sangam Portal: कंपन्या थेट प्रोफाइल पाहून करणार शॉर्टलिस्ट; १० वी पास ते पदवीधरांना एका क्लिकवर मिळणार सरकारी नोकरी

Abhijit Dipake Arrest Claim : आज रात्री आम्हाला अटक होणार... अभिजीत दिपके यांचा मोठा दावा; तिसरी चूक करु नका, सरकारला थेट इशारा

SCROLL FOR NEXT