Crime News
Crime News Sakal
देश

माणुसकीला काळीमा! 80 वर्षीय वृद्ध महिलेवर नात्यातील 22 वर्षीय तरुणाकडून अत्याचार

सकाळ ऑनलाईन

लखनऊ : उत्तर प्रदेशात गुन्हेगारीचं प्रमाण वाढताना दिसत आहे. महिला, दलित अन् धार्मिक दंगलींच्या अनेक घटना इथं वारंवार घडल्या आहेत. त्यातच आता एक हिणकस आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. यामध्ये एका ८० वर्षीय वृद्ध महिलेवर तिच्या नात्यातीलच एका २२ वर्षीय तरुणानं बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. (80 year old woman was allegedly raped by her 22 year old relative in UP Kanpur)

इंडिया टुडेच्या माहितीनुसार, 28 मार्च रोजी कानपूरच्या बिल्हौर भागात एका 80 वर्षीय महिलेवर तिच्या 22 वर्षीय नातेवाईकाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीलाही अटक केली आहे. (Marathi Tajya Batmya)

पोलिसांच्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री उशिरा महिला घरात झोपलेली असताना ही घटना घडली. आरोपीनं मद्यधुंद अवस्थेत तिच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला. त्याने या वृद्ध महिलेला बेदम मारहाण करून तिचा एक दातही तोडला. पीडितेनं जेव्हा आरडा ओरडा केला तेव्हा आरोपीनं भिंतीवरून उडी मारून पळ काढला. (Latest Marathi News)

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पीडित महिला आरोपीची आजी असून ते दोघेही एकाच परिसरात राहतात. आरोपी मजुरीचं काम करतो आणि त्याला दारू पिण्याचं व्यसन आहे. या घटनेपूर्वी त्यांनी मित्रांसोबत मद्यप्राशन केलं होतं. शुक्रवारी, आरोपीला कोर्टात हजर केलं गेलं त्यानंतर कोर्टानं आरोपीला तुरुंगात रवानगी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: डोंबिवलीत ईव्हीएम मशीन पडले बंद

IPL 2024 Playoffs : प्लेऑफसाठी नाही कोणत्या राखीव दिवस; पावसामुळे खेळखंडोबा झाला तर कसा लागणार निकाल?

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

SCROLL FOR NEXT