Ashneer Grover Sakal
देश

Ashneer Grover: अश्नीर ग्रोव्हरचा आणखी एक धमाका, बनवली 81 कोटींची नोट, काय आहे भारताचा रजीश बँड?

FIR दाखल झाल्यानंतर अश्नीर ग्रोव्हर यांचे ट्विट चर्चेत आले आहे.

राहुल शेळके

Ashneer Grover: अश्नीर ग्रोव्हरने आणखी एक धमाका केला आहे. भारत पेने अश्नीर ग्रोवरवर केलेल्या एफआयआरनंतर त्याने वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली आहे. भारत पेचे चेअरमन रजनीश कुमार यांना लक्ष्य करत ग्रोव्हर यांनी 81 कोटींची नोट ट्विट केली आहे.

यासोबतच त्यांनी आरबीआयच्या नोटवर आधारीत भारताचा रजीश बँड ऑफ इंडिया असं लिहिलं आहे. अश्नीर ग्रोव्हर यांच्यावर 81 कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आलीआहे.

ट्विटमध्ये काय लिहिले आहे?

अश्नीर ग्रोव्हरने ट्विटमध्ये लिहिले की, 'दोगलापन' पुस्तकाच्या यशानंतर आता मी काहीतरी नवीन तयार करत आहे. ज्यात दोगलापन - बोर्ड खेळ. कॉर्पोरेट 'रंजिश'चा खेळ! या खेळात बुद्धिबळ सारखे 81 चौरस असतील.

आणि त्याची किंमत रु.810 आहे. आणि प्रत्येक पावलापूर्वी तुम्हाला ओरडावे लागेल. तसेच हा खेळ ज्या चलनात खेळला जाईल. त्याची किंमत 81 कोटी रुपये असेल. चलनावर 81 कोटी लिहून ग्रोव्हर 81 कोटींच्या एफआयआरला टोमणा मारला आहे.

काय आहे प्रकरण?

आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) नुकतेच BharatPe चे माजी व्यवस्थापकीय संचालक अश्नीर ग्रोवर, त्यांची पत्नी माधुरी जैन आणि इतर कुटुंबातील सदस्यांविरुद्ध FIR नोंदवली आहे. भारतपे यांच्या तक्रारीनंतर हा एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

कंपनीने आपल्या तक्रारीत अश्नीर ग्रोव्हर, त्यांची पत्नी माधुरी जैन आणि इतर काही कुटुंबीयांवर कंपनीच्या पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे.

एफआयआर नोंदवल्यानंतर एका मुलाखतीदरम्यान अश्नीर ग्रोव्हरने भारतपेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांच्यावर आरोप करून कंपनीला बरबाद केल्याचे म्हटले आहे.

मार्च 2022 मध्ये भारत पेसोबतचे संबंध तुटले

यापूर्वी फेब्रुवारी 2022 मध्ये ग्रोव्हरची पत्नी माधुरी जैन यांना फसवणुकीच्या आरोपावरून कंपनीतून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर अशनीर ग्रोव्हरनेही मार्चमध्ये कंपनी सोडली. भारत पे यांनी माधुरी जैन यांच्यावर गंभीर आरोप केले.

कंपनीचा निधी वैयक्तिक खर्चासाठी वापरल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या अंतर्गत हा निधी इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी आणि कुटुंबासह परदेश प्रवास, घराचे इंटिरिअर डिझाइन यांवर खर्च केल्याचा आरोप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

रात्री बसमध्ये झोपलेली, सीटच्या मागून कमरेत हात; सई ताम्हणकरने तोच हात पकडला आणि... स्वतः सांगितला तो प्रसंग

Agricultural Crime : रात्रीतून फळबागेतील डाळिंब लंपास चौसाळ्यातील घटना, गुन्हा नोंदविण्यासाठी वजन-किमतीचा मुद्दा ठरतोय कळीचा

Video : "यापेक्षा कार्टून बरं" जानकी-हृषीकेशमध्ये येणार दुरावा ; घरोघरी मातीच्या चुलीवर प्रेक्षक वैतागले

Share Market: शेवटच्या तासात शेअर बाजाराचा यू-टर्न! घसरणीनंतर सेन्सेक्स वाढीसह बंद; तर निफ्टी...; वाचा बाजाराची स्थिती

SCROLL FOR NEXT