corona vaccine sakal media
देश

भारतातील ८५ टक्के पात्र लोकसंख्येला मिळाला लसीचा पहिला डोस

भारतानं १०० कोटी डोसचा टप्पा यापूर्वीच पार केला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : भारतात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढला असून देशात दोन महिन्यांपूर्वी १०० कोटी डोस पूर्ण झाले होते. हा भारतासाठी लसीकरणाबाबत एक महत्वाचा टप्पा ठरला होता. त्यानंतर आता देशातील ८५ टक्के लसीकरणासाठी पात्र लोकसंख्येला पहिला डोस देण्यात आला आहे, याद्वारे देखील भारतानं एक महत्वाचा टप्पा पार केल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे.

५० टक्क्यांहून अधिक लोकसंख्येला दोन्ही डोस

मांडविय यांनी सांगितलं की, भारतात ५० टक्के लोकांना कोरोनाच्या लसीचे दोन डोस देण्यात आले आहेत. त्याचबरोबर एकूण (पहिला आणि दुसरा) डोस झालेल्या लोकांची संख्या १,२७,६१,८३,०६५ झाली आहे. गेल्या चोवीस तासात १,०४,१८,७०७ लोकांचं लसीकरण करण्यात आलं होतं. यानंतर एकूण लसीकरण झालेल्या लोकांची संख्या वाढून ती १२७.६१ कोटींवर पोहोचली आहे.

दरम्यान, केंद्रानं ३१ डिसेंबरपर्यंत 'हर घर दस्तक' कार्यक्रमांतर्गत कोरोना लसीकरणाचं लक्ष्य निश्चित केलं होतं. भारतात रविवारी पात्र लोकसंख्येचं पूर्ण लसीकरण ५० टक्क्यांच्या पार पोहोचलं. ५० टक्क्यांहून अधिक पूर्ण लसीकरण झालेल्या राज्यांमध्ये अंदमान-निकोबार बेटे, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, चंदीगड, दादरा नगर हवेली आणि दमन-दीव, गोवा, गुजरात, हमाचल प्रदेश, केरळ, लडाख, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि त्रिपुरा यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT