Lok Sabha Election 2024 
देश

Lok Sabha Election : तपास यंत्रणांच्या गैरवापराबाबत ८७ माजी अधिकाऱ्यांचे निवडणूक आयोगाला पत्र; केली 'ही' महत्वाची मागणी

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांना, विशेषतः विरोधी पक्षांना समान संधी नाकारली जात असल्याची चिंता ८७ माजी सनदी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांना, विशेषतः विरोधी पक्षांना समान संधी नाकारली जात असल्याची चिंता ८७ माजी सनदी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यामध्ये निवडणूक आयोग अपयशी ठरल्याचा ठपका या अधिकाऱ्यांनी ठेवला आहे. तसेच, राजकीय पक्षांवर दबावासाठी तपास यंत्रणांच्या गैरवापराचा मुद्दा उपस्थित करताना या अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाला, आचारसंहितेच्या काळात तपास यंत्रणा आपल्या अधिकार कक्षेत आणाव्यात, असे आवाहन केले आहे.

निवडणूक आयोगाला पत्र लिहिणाऱ्या माजी सनदी अधिकाऱ्यांमध्ये माजी परराष्ट्र सचिव शिवशंकर मेनन, ब्रिटनमधील माजी उच्चायुक्त शिवशंकर मुखर्जी, पंजाबचे माजी पोलिस महासंचालक ज्युलिओ रिबेरो, माजी राष्ट्रीय सुरक्षा उप-सल्लागार विजय लता रेड्डी, माजी आरोग्य सचिव के. सुजाता राव, इंटेलिजन्स ब्युरोचे माजी प्रमुख एस. एस. दुल्लत, दिल्लीचे माजी नायब राज्यपाल नजीब जंग, माजी मुख्य माहिती आयुक्त वजाहत हबीबुल्लाह यांचा समावेश आहे.

या माजी सनदी अधिकाऱ्यांनी गुरुवारी आयोगाला पत्र पाठविले होते. आपण कोणत्याही राजकीय पक्षांशी संबंध नसल्याचे आणि राज्यघटनेशी कटिबद्धतेचा हवाला या अधिकाऱ्यांनी पत्रात दिला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना झालेली अटक, काँग्रेस पक्षाला प्राप्तिकर विभागाने बजावलेली नोटीस यांसारख्या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. निवडणूक काळात विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याची चिंता बोलून दाखविताना तपास यंत्रणांच्या नि:ष्पक्षपाती कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले.

या कारवायांवर आक्षेप

निवडणूक आयोगाला पाठविलेल्या पत्रात माजी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे, ‘लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली असताना विरोधी पक्षाच्या वरिष्ठ नेत्याच्या अटकेला आकसापोटी झालेल्या कारवाईचा वास येतो आहे. याशिवाय, निवडणुकीच्या आधी काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांची जुनी प्रकरणे प्राप्तिकर विभागाने उघडल्याबद्दल; तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्या निवासस्थानी झालेली झडती; विरोधी पक्षाच्या उमेदवारांना बजावलेल्या नोटिसा याबद्दलही या अधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तपास पूर्ण करणे आणि आरोपपत्र दाखल करण्यात तपास यंत्रणांचा मर्यादित वेग पाहता निवडक प्रकरणांमधील उत्साह संशयास्पद असल्याचे या माजी अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.

निवडणूक आयोगावरही नाराजी

देशभरात कारवाई सत्र सुरू असताना त्यात तत्काळ हस्तक्षेप करण्यात केंद्रीय निवडणूक आयोगाचे अपयश त्रासदायक असल्याचे माजी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तसेच, मागील महिन्यात घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनातील वाढत्या संशय दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाने कारवाई करावी अशी मागणीही केली आहे. या अधिकाऱ्यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील घटनांचा दाखला देत निवडणूक आयोगावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आयोगाने राज्यघटनेच्या ३२४ कलमांतर्गत आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्र सरकारच्या कार्यकक्षेत येणाऱ्या तपास यंत्रणा आपल्या अधिकारकक्षेत आणाव्यात, असेही आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT