देश

Accident: टेम्पो ट्रॅव्हलर आणि दूध वाहनाचा भीषण अपघात; 9 जणांचा मृत्यू

मंदिरांना भेट देऊन घरी परतत असताना भीषण अपघात

सकाळ डिजिटल टीम

सुब्रमण्य, हसनंबा मंदिरांना भेट देऊन घरी परतत असताना अरसेकेरे तालुक्यातील गांधीनगरजवळ टेम्पो ट्रॅव्हलर आणि KMF दूध वाहन यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

हा अपघात हासन जिल्ह्यातील अरसेकेरे तालुक्यातील गांधी नगर गावाजवळ शनिवारी रात्री उशिरा झाला. शिमोगा- अरसेकरे येथील राष्ट्रीय महामार्ग 69 वर हा भीषण अपघात झाला आहे.

टीटी वाहन आणि केएसआरटीसी बस आणि लॉरी यांच्यात हा अपघात झाला आहे. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. लीलावती (50), चैत्र (33), समर्थ (10), डिम्पी (12), तन्मय (10), ध्रुव (2), वंदना (20), दोड्डाय्या (60), भारती (50) अशी मृतांची नावे आहेत. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील धर्मस्थळाच्या मंजुनाथाचे दर्शन घेऊन ते गावी परतत होते. ते सर्व जण झोपेत असताना हा अपघात झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP नेत्यांचा मोठा विजय! आंदोलनाला वेग; अखेर अभिजीत दिपके यांच्यासह तिघांची सुटका, आता सर्वोच्च न्यायालयात काय घडणार?

Navratri 2026 Wishes in Marathi: 'उदे ग अंबे उदे'... नवरात्रीनिमित्त व्हॉट्सॲपवर शेअर करा देवी दुर्गेच्या आशीर्वादाचे हे सुंदर शुभेच्छा संदेश

Maharashtra Live News : सप्तशृंगी देवी यात्रेला सुरुवात,देवीच्या आभूषणांची पूजा

IND vs WI 3rd T20: इंदूरमध्येही आज बॅट विरुद्ध बॅट? दुसऱ्या सामन्यात ५०१ धावांचा पाऊस, आता तिसऱ्या टी-२०मध्येही फलंदाजांचे वर्चस्व राहणार?

Madhya Pradesh: अकराशे विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप; टीबी रुग्णांना ८ किलोची पोषण आहाराची टोपली

SCROLL FOR NEXT