Minor Boy Physical Abused e sakal
देश

ऑनलाइन शिक्षणासाठी घेतलेल्या मोबाईलवर पॉर्न व्हिडीओ, तिघांचा लहानग्यावर अत्याचार

सकाळ डिजिटल टीम

तीन अल्पवयीन मुलांनी ९ वर्षाच्या बालकावर अनैसर्गिक अत्याचार (Crime) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. तिन्ही मुलं पीडित मुलावर दीड महिन्यापासून वारंवार अत्याचार करत होते. आठवी आणि नववीत शिकणाऱ्या या तिन्ही मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तमिळनाडूच्या तुतीकोरीनमध्ये (Tamil Nadu) ही घटना घडली आहे.

दोन आठवीत आणि एक नववीत शिकणारा असे तिन्ही विद्यार्थी ऑनलाइन अभ्यास करण्यासाठी मोबाईल वापरत होते. तसेच ते मिळून याच मोबाईलवर गेम देखील खेळत होते. पण, एकाने मध्येच पॉर्न व्हिडिओ सुरू केला. तिघांनीही तो व्हिडिओ पाहिला. त्यानंतर शेजारी राहणाऱ्या पीडित मुलाला देखील तो व्हिडिओ दाखवला. त्यानंतर या तिघांनीही ९ महिन्याच्या बालकावर अनैसर्गिक अत्याचार केला. जवळपास दीड महिन्यापासून हा संतापजनक प्रकार सुरू होता. कधी घरी कोणी नसताना तर कधी गावाच्या बाहेर नेऊन हे मुलं त्याच्यावर अत्याचार करत होते.

मुलगा अत्याचाराला घाबरून घराबाहेर पडत नव्हता. मात्र, त्याचे मित्र त्याची बाहेर येण्याची वाट पाहत होते. तो बाहेर आला नाहीतर शिवीगाळ करून त्याला घराबाहेर बोलवत होते. मुलाला शारीरिक आणि मानसिक अत्याचार सहन न झाल्याने तो आजारी पडला. त्यानंतर त्याला ५ जानेवारीला कोविलपट्टी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर १५ जानेवारीपर्यंत उपचार सुरू होते. त्याच्या मानसिक आघात झाल्याचे डॉक्टरांनी त्यांच्या आई-वडिलांना सांगितले. त्यानंतर त्याचे समुपदेशन केल्यावर त्याने घडलेली घटना सांगितली. त्यानंतर ही अत्याचारी घटना उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी तिन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच पुढील कारवाई सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PF withdrawal latest Update : दिवाळीआधी केंद्र सरकारकडून नोकरदारवर्गास ‘GOOD NEWS’ ; 'PF'ची १०० टक्के रक्कम काढता येणार!

ST Workers Diwali: एसटी कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपये दिवाळी भेट; अग्रीम म्हणून 'इतकी' रक्कम मिळणार

MBBS Doctor : केवळ २५ हजारांच्‍या वेतनावर एमबीबीएस डॉक्टर काम करण्‍यास तयार

Ravindra Dhangekar : गुन्हेगारांना रोखण्यासाठी माझी लढाई

Nagpur Crime : सहा महिन्यांपासून चिंतेत, ती करतेय ‘ब्लॅकमेल’; युवकाच्या आत्महत्येचा पत्रातून खुलासा, युवतीवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT