iit kanpur alumns 
देश

फाडफाड इंग्रजी बोलणारा IITचा इंजिनिअर 90 व्या वर्षी रस्त्यावर मागतोय भीक

सकाळवृत्तसेवा

भोपाळ : रस्त्यावर भीक मागणारा एखादा व्यक्ती IIT मधून पास आऊट आहे, असं तुम्हाला सांगितलं गेलं तर? धक्का बसेल ना? अशीच एक धक्कादायक घटना मध्य प्रदेशमधून समोर आलीय. रस्त्यावर भीक मागून आपलं पोट भरणारा एक वृद्ध माणूस IIT कानपूरचा पास आऊट आहे. वयाच्या 90 व्या वर्षी ते ग्वाल्हेरच्या रस्त्यांवर लोकांकडे भीक मागून आपलं पोट भरतात. त्यांच्याशी चर्चा करताना त्यांनी दावा केलाय की, त्यांनी IIT कानपूरमधून मेकॅनिकल इंजिनिअरींगची पदवी घेतली आहे. त्यांचं नाव सुरेंद्र वशिष्ठ असं आहे. 

हेही वाचा - POK मधून चूकून भारतात आल्या; सख्ख्या बहिणींची भेटवस्तूंसह सैन्याने केली पाठवणी
ग्वाल्हेरमधील आश्रम स्वर्ग सदनचे विकास गोस्वामी यांनी सांगितलं की, ग्वाल्हेर बस स्टँडवर ते असहाय्य अवस्थेत सापडले. जेंव्हा त्यांची चौकशी करायला सुरवात केली तेंव्हा ते इंग्रजीत बोलू लागले. त्यानंतर त्यांना आम्ही आश्रमात घेऊन आलोय तसेच त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क करण्याचे काम सुरु आहे. सुरेंद्र वशिष्ठ यांनी चौकशी दरम्यान सांगितलंय की, ते 1969 च्या बॅचचे IIT कानपूरचे मेकॅनिकल इंजिनिरअरींगचे विद्यार्थी आहेत.

त्यांनी हे देखील सांगितलं आहे की, त्यांनी डीएबी कॉलेज लखनऊमधून 1972 मध्ये LLM केलं आहे. त्यांचे वडील जेसी मिल सप्लायल होते. ही मिल 1990 मध्येच बंद झाली होती. सुरेंद्र वशिष्ठ त्यांच्या भावंडांमध्ये सर्वांत लहान आहेत. त्यांनी लग्न केलं नाहीये. IIT कानपूरमध्ये शिकल्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी नोकरी देखील केली आहे. परंतु आतापर्यंत त्यांच्या नातेवाईकांपैकी कुणीही त्यांना संपर्क केला नाहीये. त्यामुळे आता या संस्थेत त्यांची देखभाल केली जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT