PM Modi 
देश

९३ माजी अधिकाऱ्यांचं मोदींना पत्र; लक्षद्वीपबाबत व्यक्त केली चिंता

समाजविघातक कारयावा प्रतिबंध कायद्याला स्थानिकांचा विरोध

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : लक्षद्वीपमध्ये नव्यानं आणलेल्या समाजविघातक कारयावा प्रतिबंध कायद्यावरुन (Prevention of anti social activities act) गेल्या काही आठवड्यांपासून मोठा गदारोळ सुरु आहे. या कायद्याला स्थानिक लोक जोरदार विऱोध करत आहेत. यावरुन आता ९३ माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या गटानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शनिवारी एक पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. (93 former civil servants write to PM over developments in Lakshadweep)

अधिकाऱ्यांनी पत्रात लिहिलं की, "विकासाच्या नावाखाली लक्षद्वीपमध्ये काळजी वाढवणाऱ्या घडामोडी घडत आहेत. पंतप्रधानांनी इथं एक असं योग्य विकास मॉडेल निश्चित करावं ज्यामध्ये स्थानिकांचे विचारही जाणून घेतले जातील. तसेच या मॉडलमध्ये सुरक्षा, चांगल्या आरोग्य सुविधा, शिक्षण आणि चांगल्या शासन प्रशासन यंत्रणेसह इतर गोष्टींचा समावेश असेल.

भारताच्या मानचित्रात लक्षद्वीपचं एक वेगळं स्थान असून ते सांस्कृतीक विविधतांनी भरलेलं आहे. या पत्रात त्या तीन कायद्यांच्या मसुद्याबाबत भाष्य करण्यात आलं आहे, ज्यांवर सध्या वाद सुरु आहे. डिसेंबर २०२० मध्ये लक्षद्वीपचा प्रशासक म्हणून अतिरिक्त पदभार स्विकारलेल्या पी. के. पटेल यांनी हा मसुदा मांडला आहे. दादरा व नगर हवेली आणि दीव-दमन या केंद्र शासित प्रदेशांचेही पटेल हे प्रशासक आहेत.

'या' अधिकाऱ्यांसह ९३ जणांच्या सह्या

पंतप्रधानांना लिहिलेल्या या पत्राच्या प्रती गृहमंत्री अमित शहा, पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. या पत्रावर माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन, प्रसार भारतीचे माजी सीईओ जवाहर सरकार, माजी परराष्ट्र सचिव सुजाता सिंह, पंतप्रधानांचे माजी सल्लागार टी. के. ए. नायर यांच्यासह ९३ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

काँग्रेसची टीका

दरम्यान, काँग्रेसचे केरळ आणि लक्षद्वीपचे प्रभारी तारिक अन्वर यांनी या कायद्याचा मसुदा हा लक्षद्वीपसाठी घातक असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं की, "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याप्रकरणी तत्काळ लक्ष घालून प्रफुल्ल पटेल यांना प्रशासक पदावरुन हटवण्यात यावं" प्रफुल्ल पटेल यांच्यावर आरोप आहे की, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि लोकांशी विनाचर्चा मनमानी पद्धतीने निर्णय घेतले आहेत. यामुळेच स्थानिक लोक त्यांचा जोरदार विरोध करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai BEST Election Results : बेस्ट पतपेढी निवडणुकीत उत्कर्ष पॅनेलचा दारुण पराभव, मुंबई महापालिका निवडणुकीआधीच ठाकरे बंधुंना मोठा धक्का

Mumbai Rain Update: मुंबईत तिसऱ्या दिवशीही मुसळधार, लोकल सेवेचा खोळंबा, अनेक गाड्या रद्द, चाकरमान्यांचे हाल

Shivaji Maharaj : काय होता शिवरायांचा संतुलित आहार? युद्धासाठी नेहमी तंदुरुस्त राहण्यामागचं खरं रहस्य! आजच्या पिढीसाठी प्रेरणा

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्याला झटपट बनवा चवदार ज्वारीची उकडपेंडी, सोपी आहे रेसिपी

MP Udayanraje Bhosale: उरमोडी प्रकल्प विस्ताराला केंद्राचा हिरवा कंदील: उदयनराजे भोसले; 'जल आयोगाकडून ३०४२.६७ कोटींचा निधी मंजूर'

SCROLL FOR NEXT