महिला इंजिनिअरची पोलिसांत विचित्र तक्रार! म्हणे, तिला एक अदृश्‍य शक्ती... esakal
देश

महिला इंजिनिअरची विचित्र तक्रार! म्हणे, तिला एक अदृश्‍य शक्ती...

महिला इंजिनिअरची पोलिसांत विचित्र तक्रार! म्हणे, तिला एक अदृश्‍य शक्ती...

सकाळ वृत्तसेवा

मध्य प्रदेशातील बैतूलमध्ये एका महिला उपअभियंत्याची विचित्र तक्रार पोलिसांपर्यंत पोहोचली आहे.

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) बैतूलमध्ये एका महिला उपअभियंत्याची विचित्र तक्रार पोलिसांपर्यंत (Police) पोहोचली आहे. या महिला उपअभियंत्याने पोलिसांत तक्रार दिली आहे की, कोणीतरी अदृश्‍य शक्ती (Invisible Power) तिला त्रास देत आहे आणि तिच्या टिफीनमधील भाजी खात आहे.

कोतवाली टीआय रत्नाकर हिंगवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बैतूल येथील पंतप्रधानंत्री रस्ता योजनेत काम करणारी महिला उपअभियंता श्रुती झाडे हिने 2 डिसेंबर रोजी कोतवाली पोलिसांकडे अर्ज केला आणि सांगितले की, काही अदृश्‍य शक्ती तिला त्रास देत आहे. टिफीनमध्ये ठेवलेली भाजीही ही अदृश्‍य शक्ती खात असल्याचा आरोप उपअभियंता श्रुती झाडे यांनी केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून तिच्या दागिन्यांचे वजनही कमी झाले असून, त्याशिवाय तिचे पैसे आणि कपडेही चोरीला गेल्याचा आरोप उपअभियंत्याने केला आहे. महिला उपअभियंत्याने दावा केला, की त्या अदृश्‍य शक्तीचे पाय तिला दिसतात. उच्चशिक्षित आणि अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका महिलेने ही तक्रार केल्याने पोलिसांना आश्‍चर्याचा धक्काच बसला आहे.

कोतवाली टीआय रत्नाकर हिंगवे सांगतात की, श्रुती झाडे यांना समजावून सांगण्यात आले आहे की, ती सांगत आहे तशी कोणतीही वस्तुस्थिती समोर आली नाही आणि ती तिच्या मनाची शंका आहे. सध्या या महिलेच्या या अजब तक्रारीची सर्वत्र चर्चा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

kolhapur BJP : भाजप तालुका पदाधिकाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, अपहार केल्याचा आरोप सहन झाला नाही अन्

Post-COVID Cancer Surge: कोरोनानंतर कर्करोगाचे सावट! सोलापुरात रुग्णसंख्या दुपटीने, म.फुले योजनेत केमोथेरपीचे प्रमाण वाढले

CM Relief Fund:'सोलापुरातील कारखान्यांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 15 कोटी मिळणार': मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद

IPL vs ICC : प्रत्येकी ५८ कोटी! दोन खेळाडूंना आयपीएल फ्रँचायझीकडून ऑफर; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची अट...

Latest Marathi News Live Update : ईडीचा अ‍ॅक्शन मोड! मुंबईत ८ ठिकाणी छापे

SCROLL FOR NEXT