UP Lok Sabha Candidate Shoe necklace Esakal
देश

Viral Video: गळ्यात 7 चप्पलांचा हार अन् दारोदारी प्रचार, जाणून घ्या संपूर्ण प्रकार

Loksabha 2024: गेल्या वर्षी अलिगड महापालिकेच्या ६९ व्या प्रभागातून अपक्ष उमेदवार म्हणून पंडित केशवदेव घरातून झाडाच्या फांदीवर बसून जिल्हाधिकारी कार्यालयातील नामनिर्देशन केंद्रावर पोहोचले होते.

आशुतोष मसगौंडे

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात वातावरण तापले आहे. निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवार नवनवीन खेळ्या खेळत असतात.

दरम्यान मतदारांना आकर्षित करण्यासाठी उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये एका उमेदवाराने असे काही केले आहे जे पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले.

एखाद्याला शिक्षा करण्यासाठी किंवा अपमानित करण्यासाठी चप्पलचा हार घातल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. मात्र अलिगढचे लोकसभेचे अपक्ष उमेदवार पंडित केशवदेव गौतम यांनी चप्पलचा हार घालून निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे.

या सर्वांमध्ये गमतीची गोष्ट अशी की, अपक्ष उमेदवार असलेल्या केशव देव यांना निवडणूक आयोगाकडून चप्पल हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे पंडित केशवदेव गौतम सात चपलांचा हार घालून जागोजागी फिरत आहेत आणि लोकांना भेटत आहेत.

पंडित केशव देव हे आरटीआय कार्यकर्ते आहेत. ते भारतीय हिंदू राष्ट्र सेना आणि भ्रष्टाचार विरोधी सेना या संघटनाही चालवतात. त्यांनी दोनदा विधानसभा निवडणूक लढवली आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत पंडित केशवदेव यांनी नगर विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवली होती, त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

गेल्या वर्षी अलिगड महापालिकेच्या ६९ व्या प्रभागातून अपक्ष उमेदवार म्हणून पंडित केशवदेव घरातून झाडाच्या फांदीवर बसून जिल्हाधिकारी कार्यालयातील नामनिर्देशन केंद्रावर पोहोचले होते.

गेल्या सोमवारी अलिगड लोकसभा जागेसाठी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. या कालावधीत अपक्ष उमेदवारांसह दोन उमेदवारांनी आपली नावे मागे घेतली. त्यानंतर 14 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. 28 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत एकूण 21 जणांनी अर्ज दाखल केले होते. या कालावधीत पाच उमेदवारांचे अर्ज फेटाळण्यात आले तर दोघांनी आपली नावे मागे घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

आमिर खान यांना 'सितारे ज़मीन पर' च्या प्रचंड यशानिमित्त देशभरातील एग्झिबिटर्सकडून विशेष सन्मान!

कॅन्सरग्रस्त दीपिका कक्करला भेटायला पोहोचली मराठमोळी सोनाली कुलकर्णी; दोघींचा नेमकं नातं काय?

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT