MiG 29K fighter aircraft crashed Sakal
देश

MiG 29K Crashed : नौदलाचे MiG-29K गोव्यात क्रॅश, वैमानिक सुखरूप

तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

MiG 29K fighter Aircraft Crashed : गोव्याच्या किनाऱ्यावर भारतीय हवाई दलाचे 29के लढाऊ विमान समुद्रात क्रॅश झाल्याचे समोर आले आहे. हे विमान तळावर परतत असताना त्यात तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, सुदैवाची बाब म्हणजे या उपघातात वैमानिक सुखरूप असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती भारतीय नौदलाकडून देण्यात आली आहे. गोव्याच्या किनाऱ्यावर नियमित उड्डाण करून तळावर परतत असताना काही तांत्रिक बिघाडामुळे मिग-२९ के हे लढाऊ विमान समुद्रात कोसळल्याचे सांगितले जात आहे.

अपघातापूर्वी वैमानिकाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत विमानातून समुद्रात उडी मारली. त्यानंतर नौदलाने शोध आणि बचाव सूत्र तातडीने हालवत या वैमानिकाला वाचवण्यात यश मिळवले. सध्या वैमानिकाची प्रकृती स्थिर असल्याचे नौदलाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, मिग-29 'के' लढाऊ विमानाचा अपघात नेमका कसा झालाचा याचा तपास करण्याचे आदेश BOI ला देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT