देश

बिपीन रावत यांच्यासह इतरांचे पार्थिव नेणाऱ्या रुग्णवाहिकेला अपघात

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : सीडीएस जनरल बिपीन रावत (Bipin rawat, Indian military chief), त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि इतर 11 अधिकाऱ्यांचा काल एका हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान या 13 जणांच्या पार्थिवांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा देखील किरकोळ अपघात झालेला पहायला मिळाला आहे. आज गुरुवारी सकाळीच पार्थिवांना वेलिंगटनमधून मद्रास रेजिमेंटल सेंटरकडे नेण्यात येत होतं. रेजिमेंटल सेंटरमधून त्यांच्या पार्थिवांना सुलूर एअरबेसकडे नेण्यात येणार होतं. मात्र, या ताफ्यातील एका रुग्णवाहिकेचे संतुलन बिघडलं आणि ती अनियंत्रित होऊन एका लहानच्या टेकडीला जाऊन धडकली. याबाबतचं वृत्त 'नवभारत टाईम्स'ने दिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात किरकोळ स्वरुपाचा होता. फार मोठी धडक घडली नाही, त्यामुळे त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. ही दुर्घटना मद्रास रेजिमेंटल सेंटरमधून सुलूर एअरबेसच्या दरम्यानच्या रस्त्यामध्ये मेट्टूपलयमजवळ झाला आहे. या पार्थिवांना सुलूर एअरबेसमधून आज सायंकाळपर्यंत दिल्लीकडे एअरलिफ्ट करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

SCROLL FOR NEXT