Rajasthan Crime News Esakal
देश

"तू शाळेत आल्यास वातावरण खराब होईल," मुख्याध्यापकाने उद्ध्वस्त केले पीडितेच्या शिक्षणाचे स्वप्न

Rajasthan News: या सर्व प्रकरणानंतर पीडितेने आरोप केला आहे की, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी तिला विद्यालयात यायचे नाही असे सांगितले होते.

आशुतोष मसगौंडे

राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील एका खाजगी महाविद्यालयाने 12वीत शिकणाऱ्या बलात्कार पीडितेचे नाव काढून टाकल्याने पीडित मुलगी बोर्डाच्या परीक्षेला मुकली.

ही अल्पवयीन विद्यार्थी हा एका खासगी महाविद्यालयात 12 वीच्या वर्गात शिकत होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर महाविद्यालयाने तिला घरीच राहण्यास सांगत महाविद्यालयातून नाव काढून टाकले.

या सर्व प्रकरणानंतर पीडितेने आरोप केला आहे की, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी तिला महाविद्यालयात यायचे नाही असे सांगितले होते.

पीडितेच्या येण्याने महाविद्यालयाचे वातावरण बिघडेल असे प्राचार्याचे म्हणणे होते. नंतर तिचे नावही काढून टाकण्यात आले आणि ट्रान्सफर सर्टिफिकेट (TC) जारी करण्यात आले. त्यामुळे पीडिता बोर्डाच्या परीक्षेला बसू शकली नाही.

या पीडित मुलीने तिच्या वडिलांसह अजमेर जिल्हा बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा अंजली शर्मा यांची नुकतीच चाइल्ड हेल्पलाइनद्वारे भेट घेतली आणि या प्रकरणाची माहिती दिली.

शर्मा यांनी ही तक्रार जिल्हाधिकारी आणि शिक्षण विभागाकडे पाठवली. या प्रकरणाची शुक्रवारी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशी केली.

पीडितेला नियमाविरुद्ध ट्रान्सफर सर्टिफिकेट देण्यात आल्याने आणि तिचे नाव काढून टाकल्याने ती बोर्डाच्या परीक्षेला बसू शकली नाही, असे तपासात उघड झाले.

शर्मा म्हणाले, 'गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता आणि आरोपींना अटक करण्यात आली होती. पीडितेने सांगितले की, या घटनेनंतर महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी तिला शाळेत यायचे नाही असे सांगितले, कारण यामुळे वातावरण खराब होईल.

यानंतर मुलगी शाळेत गेली नाही. ते म्हणाले की डिसेंबरमध्ये सहामाही परीक्षेपूर्वी विद्यार्थिनीने शाळेशी संपर्क साधला तेव्हा तिला सांगण्यात आले की, तिचे नाव काढून टाकण्यात आले आहे.

यामुळे ती पुढे बोर्डाच्या परीक्षेला ती बसू शकली नाही. ती एक हुशार विद्यार्थिनी आहे. आम्ही आशा करतो की तिला येत्या काही दिवसांत पुरवणी परीक्षांदरम्यान बोर्डाच्या परीक्षेला बसण्याची परवानगी मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक, राहुल गांधींसह ११ नेत्यांनी दाखल केली याचिका, सुनावणी कधी?

Laptop Mobile Cleaning Tips: मोबाईल बाथरूमपासून बेडरूमपर्यंत कुठेही नेता? मग जंतूंचा संपर्क कमी करण्यासाठी स्वच्छतेच्या 'या' टिप्स वापराच

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे अजूनही सर्वोच्च न्यायालयात, इंडिया आघाडीचे नेतेही उपस्थित

रेल्वे प्रवासात प्रवाशांची घुसमट, अपुऱ्या सुविधांमुळे दररोज गर्दीशी सामना; अतिरिक्त लोकलची मागणी

मायकल जॅक्सनला टिळा लावून स्वागत करणारी एकमेव अभिनेत्री; कसा होता तो अनुभव? सोनाली बेंद्रे म्हणाली- मी कधीच.

SCROLL FOR NEXT