देश

कोलकात्यात शुटआऊट, महिलेची हत्या करून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

सकाळ डिजिटल टीम

कोलकाता : कोलकाता येथील बांग्लादेश उच्चायुक्तालयाबाहेर तैनात असलेल्या एका पोलिसाने गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून, घटनेनंतर पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वरही गोळी झाडत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गोळीबार करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने दोन ते तीन वेळी गोळीबार केला. परंतु, त्याचा नेम चुकला त्यानंतर त्याने महिलेला लक्ष्य केले अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शीने दिली.

दरम्यान, पोलीस कर्मचारी अचानक बाहेर आला आणि त्याने गोळीबार सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. गोळीबारात दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वरही गोळी झाडली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, हा पोलीस कर्मचारी कोण होता आणि त्याने अशा प्रकारचे कृत्य का केले हे अद्यापपर्यंत समजू शकलेले नाही. त्याशिवाय पोलीस कर्मचाऱ्याच्या गोळीबारात ठार झालेल्या महिलेचीही ओळख अद्याप पटलेली नाही.

पोलीस बंदोबस्त तैनात, तपास सुरू

घटनेनंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असून, गृह मंत्रालयानेही या प्रकरणाची दखल घेत पश्चिम बंगाल सरकारकडून अहवाल मागवला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT