Hyderabad  sakal
देश

Hyderabad : ‘महसूल’मधील अनुसूयाला मिळाली नवी ओळख

हैदराबादमधील भारतीय महसूल सेवा (आयआरएस)एका महिला अधिकाऱ्याने तिचे नाव आणि लिंग बदलले असून केंद्रीय अर्थ मंत्रालयानेही त्यास मंजुरी दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

हैदराबाद : हैदराबादमधील भारतीय महसूल सेवा (आयआरएस)एका महिला अधिकाऱ्याने तिचे नाव आणि लिंग बदलले असून केंद्रीय अर्थ मंत्रालयानेही त्यास मंजुरी दिली आहे. वरिष्ठ ‘आयआरएस’ अधिकारी असलेल्या एम. अनुसूया (वय ३५) यांनी त्यांच्या नावात आणि लिंगात बदल केला आहे.

महिलेतून पुरुषात असा लिंग बदल आणि एम. अनुसूया हे नाव बदलून एम. अनुकथीर सूर्या असा बदल करण्यासाठी त्यांनी विनंती केली होती. केंद्राने ही विनंती मान्य केली आहे.भारतीय महसूल सेवेत लिंगबदलाची ही पहिलीच घटना आहे. एम. अनुसूया या सध्या हैदराबाद येथील सीमाशुल्क उत्पादन आणि सेवा कर अपीलीय न्यायाधिकरणाच्या मुख्य आयुक्त कार्यालयात सहआयुक्त आहेत.

केंद्रीय अर्थ मंत्रालय, महसूल विभागाच्या (केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ) अवर सचिवांनी त्यांची विनंती मान्य केली आहे. ‘अनुसूया यांची विनंती मान्य करण्यात आली आहे आणि येथून पुढे सर्व अधिकृत नोंदीत या अधिकाऱ्याची ओळख श्री एम. अनुकथीर सूर्या अशी असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Orange Alert : विदर्भाला ‘ऑरेंज अलर्ट’; राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता पुणे घाटमाथ्याला ‘यलो अलर्ट’

IND vs NZ T20I Squad: भारत-न्यूझीलंड ट्वेंटी-२० मालिकेसाठी संघ जाहीर; अष्टपैलू खेळाडूची माघार, १५ जणांची तगडी टीम

PITRU PAKSHA 2026 VASTU TIPS: घरात सुख-शांती आणि सकारात्मकता राहिल टिकून! पितृपक्षापूर्वी फक्त 'या' ४ वस्तू बाहेर काढा

Marathi News Live Updates : माथेरान टॉय ट्रेनच्या मार्गावर दरड कोसळली

Ajit Pawar Jay Pawar : अजित पवारांचा 'अजित सृष्टी' देखावा पाहून जय पवारांना रडू आवरलं नाही; ‘आई अजून रडत असते का'?

SCROLL FOR NEXT