Swati Maliwal  sakal
देश

Swati Maliwal : स्वाती मालिवाल यांना धक्काबुक्की?

आम आदमी पक्षाच्या(आप) खासदार स्वाती मालिवाल यांना सोमवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे साहाय्यक विभव कुमार यांच्याकडून धक्काबुक्की झाल्याच्या कथित घटनाक्रमानंतर जोरदार खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री कार्यालय किंवा ‘आप’कडून याबाबत अद्यापपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या(आप) खासदार स्वाती मालिवाल यांना सोमवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे साहाय्यक विभव कुमार यांच्याकडून धक्काबुक्की झाल्याच्या कथित घटनाक्रमानंतर जोरदार खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री कार्यालय किंवा ‘आप’कडून याबाबत अद्यापपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, भाजपने या निमित्ताने मुख्यमंत्री केजरीवाल यांना लक्ष्य केले.

या संपूर्ण प्रकरणात पोलिसांकडे यासंदर्भातील औपचारिक तक्रार दाखल झाली नव्हती. पोलिसांच्या सांगण्यानुसार स्वाती मालिवाल यांनी दोन वेळा पोलिस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी केला होता. पहिला दूरध्वनी साडेनऊच्या सुमारास तर दुसरा दूरध्वनी दहाच्या सुमारास आला होता. त्यानंतर तातडीने पोलिसांचे फिरते पथक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीही पोहोचले होते.

दिल्लीच्या उत्तर विभागाचे पोलिस उपायुक्त मनोज मीणा यांच्या म्हणण्यानुसार खासदार स्वाती मालिवाल यांना धक्काबुक्की झाल्यानंतर हे दूरध्वनी आले होते. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कार्यालयाकडून किंवा आपकडूनही यावर भाष्य करण्यात आलेले नाही.

दिल्लीतील मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगात असलेल्या मुख्यमंत्री केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीसाठी जामीन मिळाल्यानंतर ते बाहेर आले असून पक्षाच्या पदाधिकारी आणि नेत्यांसमवेत त्यांच्या बैठका सुरू आहेत.

या घटनेनंतर केंद्रातील सत्ताधारी भाजपने या मुद्द्यावरून ‘आप’ला लक्ष्य केले आहे. भाजप नेत्या आणि दिल्लीतील उमेदवार बांसुरी स्वराज यांनीही स्वाती मालिवाल यांच्यावरील हल्ला लाजिरवाणी घटना असल्याची टिपणी केली. तसेच हा प्रकार मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या उपस्थितीत घडल्याचाही दावा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RuPay Card Changes: RuPay कार्डधारकांना धक्का! 1 एप्रिलपासून नियम बदलणार; PNB-HDFC चा मोठा निर्णय

Pune News: ह्रदयद्रावक घटना! गावाला रस्ता नसल्याने वेळेवर मिळाले नाहीत उपचार, चिमुकल्याचा वाढदिवशीच करुण अंत..

IPL 2026 Marathi News: रोहित शर्मा Impact Player म्हणून खेळणार? सराव सुरू; मुंबई इंडियन्सची Playing XI कशी असणार?

Education Department: शिक्षण विभाग ‘मनोहर’वर मेहरबान; देवळी कला मारहाण प्रकरण, शिक्षकावर कारवाई केव्हा?

HPCL Jobs Alert: सरकारी नोकरीचा बंपर चान्स! डिप्लोमा ते CA उमेदवारांसाठी लाखोंच्या पगारासह HPCL मध्ये 700+ जागा, असा करा अर्ज

SCROLL FOR NEXT