देश

'आप'कडून पंजाबसाठी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर, केजरीवालांची घोषणा

ओमकार वाबळे

पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. कालच निवडणूक आयोगाने मतदानाची तारीख पुढे ढकलली. त्यामुळे पंजाबात 14 ऐवजी 20 फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे. दरम्यान, त्याआधी आम आदमी पार्टीने पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केला आहे.

अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन आपच्या पंजाबसाठी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याची घोषणा केली. भगवंत मान यांच्या गळ्यात केजरीवालांनी माळ टाकली आहे. त्यामुळे पंजाबात आपचं सरकार आल्यास त्याचं नेतृत्व मान यांच्या हातात असणार आहे.

भगवंत मान यांच्या नावाच्या घोषणेनंतर अरविंद केजरीवाल म्हणाले, 'सरदार भगवंत मान यांना पंजाबमध्ये 'आप'चा मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. संपूर्ण पंजाब आम आदमी पार्टीकडे आशेच्या रूपात पाहात आहे. ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि मला खात्री आहे की भगवंत प्रत्येक पंजाब जनतेच्या चेहऱ्यावर हसू आणतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

US Iran Conflict: इराणची पाच तेलवाहू जहाजे लक्ष्य; युद्धनौकांवरील हल्ल्यांना अमेरिकेचे प्रत्युत्तर, जॉर्डनमध्येही हल्ले

Vidyanand Bapat : गणेशोत्सवावरील वक्तव्य भोवले? विद्यानंद बापटांना ४८ तासांत माफी मागण्याची नोटीस

Maharashtra Sugarcane: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ऊस गाळपाचा मुहूर्त ठरला; १५ ऑक्टोबरपासून २०२६-२७ चा ऊस गाळप हंगाम सुरू होणार

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

SCROLL FOR NEXT