Arvind Kejriwal Sakal
देश

'दिल्ली रिमोट कंट्रोल...'; बैठकीनंतर विरोधकांचा 'आप'वर निशाणा

अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या काही अधिकाऱ्यांशी बैठक घेतली.

सकाळ डिजिटल टीम

चंदीगढ : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पंजाबचे मुख्य सचिव आणि वीज विभागाच्या मोठ्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. विशेष म्हणजे ही बैठक पंजाबचे नवे मुख्यमंत्री भगवंत माण यांच्या उपस्थिती शिवाय झाली आहे. त्यानंतर पंजाबमधील विरोधी पक्षाने आपवर निशाणा साधला आहे.

अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या वीज विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत राज्याचे मुख्य सचिव आणि सचिवदेखील उपस्थित होते. पण या बैठकीत मुख्यमंत्री उपस्थित नसल्याने विरोधी पक्षाने आपवर निशाणा साधला आहे. विरोधी पक्षाने अरविंद केजरीवाल यांच्यावर रिमोट कंट्रोलवर पंजाब चालवण्याचा आरोप लावला आहे. पंजाब कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंग, नवज्योतसिंग सिद्धू तसेच भाजपाचे मनजिंदर सिरसा यांनी आणि अकाली दलाचे दलजीत चिमा यांनी आपवर ट्वीट करत निशाणा साधलाय.

नवज्योत सिंग सिद्धू यांनी ट्वीट करत म्हटलंय की, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत केजरीवालांनी आयएएस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. हे चुकीचं असून त्यांनी संविधानाचं उल्लंघन केलं आहे. त्यांना याचं उत्तर द्यावं लागेल असं सिद्धू यांनी ट्वीट करत म्हटलं आहे. तसेच अमरिंदर सिंग राजा यांनीसुद्धा सरकारी अधिकाऱ्यांवर निशाना साधलाय. ते म्हणाले की पंजाबचे वरिष्ठ अधिकारी आता केजरीवालांच्या दरबारात हजेरी लावणार का? आणि पंजाबचे मुख्यमंत्री फक्त नावासाठी आहेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान याप्रकरणी आम आदमी पक्षाकडून अजून काही प्रतिक्रिया आलेली नसून पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली आहे. दरम्यान विरोधी पक्षांकडून आपवर जोरदार टीका होत असून पंजाब हा रिमोट कंट्रोलवर चालवण्यात येत असल्याची टीका केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

SCROLL FOR NEXT