Aap Party Sakal
देश

AAP-Congress Alliance: दिल्लीत आप-काँग्रेसची मैत्री संपुष्टात! केजरीवालांचा विधानसभा स्वबळावर लढण्याचा निर्णय

लोकसभा निवडणुकीत या आघाडीनं दिल्लीतील सर्वच्या सर्व सातही जागा गमावल्या आहेत.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुका संपताच दिल्लीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेस समवेतची आघाडीही संपुष्टात आली आहे. पुढील वर्षी होणारी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा ‘आप‘नं केल्यानंतर काँग्रेसनंही ‘आप’शी युती ही केवळ लोकसभा निवडणुकीपुरतीच होती, असं प्रत्युत्तर दिलं आहे. (AAP Congress alliance ends decided to fight on its own for delhi assembly)

दिल्लीत लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष आणि काँग्रेसची आघाडी झाली होती. त्यात ‘आप’ने चार तर काँग्रेसने तीन जागा लढवल्या. या व्यतिरिक्त गुजरात आणि हरयाणातही आपसाठी काँग्रेसने एक- एक जागा सोडली होती. यामध्ये दिल्लीत काँग्रेस आणि आपच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला आणि सलग तिसऱ्यांदा भाजपने सातही जागा सहजगत्या जिंकल्या.

दिल्लीत सातही जागा जिंकणाऱ्या भाजपला ५४ टक्के मिळाली आहेत. तर आम आदमी पक्षाला २५.२६ टक्के आणि काँग्रेसला काँग्रेसची १८.२० टक्के मते मिळाली आहेत. दोन्ही पक्षांच्या मतांची एकत्रित टक्केवारी भाजपपेक्षा कमी असल्याने आघाडी करूनही दोन्ही पक्षांना फायदा झालेला नसल्याने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची मागणी काँग्रेस आणि आम आदमी पक्षामधून सुरू झाली होती. त्यापार्श्वभूमीवर लोकसभेच्या निकालांचे विश्लेषण करण्यासाठी आपच्या आमदारांची काल मुख्यमंत्री निवासस्थानी बैठक झाली होती.

या बैठकीनंतर पराभवाचे खापर काँग्रेसशी झालेल्या आघाडीवर फोडले. तसेच आगामी २०२५ च्या विधानसभा निवडणुका एकट्याने लढविण्याचा निर्णयही ‘आप’ने घेतला. दुसरीकडे, काँग्रेसच्या माध्यम विभागाचे प्रमुख पवन खेडा यांनी आपच्या या घोषणेला फारसे महत्त्व देण्याचे टाळले. ‘इंडिया’ आघाडी तयार झाली होती तेव्हाच काँग्रेसतर्फे स्पष्ट करण्यात आलं होतं की 'आप'शी आघाडी ही केवळ लोकसभा निवडणुकीपुरताच आहे, अशा शब्दांत पवन खेडा यांनी पत्रकारांशी बोलताना आपशी आघाडी केव्हाच संपली असल्याचा निर्वाळा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT