Arvind Kejriwal eSakal
देश

INDIA Mumbai Meeting: केजरीवाल 'इंडिया'च्या मुंबईतल्या बैठकीला लावणार हजेरी; स्वतःचं सांगितली रणनिती

त्यांच्या या स्पष्टीकरणामुळं आप आणि काँग्रेसमधला वाद मिटल्याचं बोललं जात आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : मुंबईत विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीची बैठक ३१ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. या बैठकीत आम आदमी पार्टी सहभाग घेणार नसल्याच्या चर्चा होत्या. पण आता दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आपण या बैठकीला हजर राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यांच्या या स्पष्टीकरणामुळं आप आणि काँग्रेसमधला वाद मिटल्याचं बोललं जात आहे. (AAP Convener & Delhi CM Arvind Kejriwal statement on upcoming INDIA alliance meeting at Mumbai)

केजरीवाल यांनी काय म्हटलंय?

माध्यमांच्या प्रतिनिधींनी केजरीवाल यांना मुंबईत होणाऱ्या इंडियाच्या बैठकीला हजेरी लावण्याबाबत प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना ते म्हणाले, "आम्ही मुंबईला जाणार आहोत. त्यानंतर आमची रणनीती काय असेल ही तुम्हाला सांगू"

आप आणि काँग्रेसचा वाद काय?

दिल्ली विधेयकाला काँग्रेसनं पाठिंबा दिल्यानंतर लोकसभा निवडणुकीत जागा वाटपावरून आघाडी होईल, असं बोललं जात होतं. परंतु ‘आप’च्या मंत्री आतिशी यांनी विधानसभा व दिल्ली लोकसभेच्या सातही जागा ‘आप’ लढविणार व या दोन्ही निवडणुकांमध्ये चांगले यश प्राप्त करेन, असा दावा केला आहे. (Marathi Tajya Batmya)

‘काँग्रेस'ने ‘आप’पासून दूर राहावं

काँग्रेसचे नेते व माजी खासदार संदीप दीक्षित हे काँग्रेसनं ‘आप’पासून दोन हात दूर राहावं, या भूमिकेवर ठाम आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे विश्वसनीय नेतृत्व नाही, ते कधी कोणती भूमिका घेतील हे सांगता येत नाही. ते आपल्या सोयीनुसार भूमिका बदलतात, असं दीक्षित यांनी म्हटले आहे. (Latest Marathi News)

अशा प्रकारे काँग्रेस आणि आप या दोन्ही पक्षांमध्ये दिल्लीत जागा वाटपावरुन बिनसलं असल्यानं आपच्या इंडिया आघाडीतील समावेशावरुन संभ्रम निर्माण झाला आहे. यापार्श्वभूमीवर आप मुंबईतील इंडियाच्या बैठकीला हजेरी लावणार नाही अशी चर्चा होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT