aap invites hardik patel to party amid buzz over rift in congress  Sakal
देश

"काँग्रेसमध्ये आवडत नसेल, तर.."; हार्दिक पटेल यांना 'आप'कडून ऑफर

सकाळ डिजिटल टीम

अहमदाबाद : गुजरात काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल हे पक्षातील अंतर्गत भांडणातून राजीनामा देऊ शकतात, अशा चर्चेदरम्यान, आम आदमी पक्षाचे गुजरातचे प्रमुख गोपाल इटालिया यांनी आज त्यांना 'आप'मध्ये सामील होण्याचे निमंत्रण दिले आहे. दोन्ही समविचारी पक्ष असल्याचे सांगत पटेल यांच्यासारख्या समर्पित लोकांना कॉंग्रेसमध्ये स्थान नाही असे देखील इटालिया म्हणाले.

"जर हार्दिक पटेलला काँग्रेसमध्ये आवडत नसेल, तर त्यांनी काँग्रेसकडे तक्रार करण्यापेक्षा आप सारख्या समविचारी पक्षात जावे, आपला वेळ वाया घालवण्याऐवजी त्यांनी येथे योगदान द्यावे... काँग्रेससारख्या पक्षात त्याच्यासारख्या समर्पित लोकांना स्थान नसते. " असे इटालियाने एएनआयला सांगितले. हार्दीक पटेल यांनी मात्र काँग्रेस सोडणार असल्याच्या अफवांचे खंडन केले आहे.

"मी आजपर्यंत काँग्रेसला माझे 100 टक्के दिले आहेत, आणि येत्या दिवसांतही तेच देईन. गुजरातमध्ये आम्ही अधिक चांगला विकास करू. पक्षांतर्गत लहान-मोठे भांडणे होतील, दोषारोपाचे खेळ होतील, पण गुजरातच्या विकासासाठी आम्हाला एकत्र काम करावे लागेल.," असे हार्दिक पटेल म्हणाले.

"खरे बोलणे गुन्हा असेल तर मला दोषी समजा. गुजरातच्या जनतेच्या आमच्याकडून अपेक्षा आहेत, आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे," असेही त्यांनी यावेळी सांगितले. हार्दिक पटेल 2015 मध्ये गुजरातमधील समाजासाठी आरक्षणाच्या मागणीसाठी पाटीदार आंदोलनाचे नेते म्हणून उदयास आले आणि नंतर काँग्रेसमध्ये सामील झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Decisions: राज्यातील शिक्षकांना UGCच्या निर्देशानुसार मिळणार मूळ वेतन, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय!

Raigad Fort Restoration: छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणींना उजाळा, रायगडावर दारूगोळा कोठारांचे जतन-संवर्धन सुरू; अनेक ऐतिहासिक पैलू उलगडणार

'शी हा कसला घाणेरडेपणा...'लाईव्ह शोमध्ये धुरधंर फेम गायिकेनं स्वत:च्या अंगावर ओतलं पाणी, नेटकरी संतापले, म्हणाले... Viral Video

Latest Marathi News Live Update: भोंदू राजेंद्र गडगेच्या आश्रमाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून झाडाझडती

Ayodhya: रामलल्लाच्या दर्शनासाठी ऑनलाईन ‘तत्काळ पास’ सुरू! जाणून घ्या Special Pass booking ची पूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT