aap ka ramrajya web portal arvind kejriwal and mann govt work ls poll politics Sakal
देश

‘आप का रामराज्य’ संकेतस्थळाचे अनावरण; अरविंद केजरीवाल आणि मान सरकारची कामगिरी जनतेसाठी खुली

लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील केजरीवाल सरकार आणि पंजाबमधील भगवंत मान सरकारच्या कामगिरीचे प्रदर्शन करण्यासाठी आम आदमी पक्षाने रामनवमीचे औचित्य साधून ‘आप का रामराज्य’ (आपचे रामराज्य) हे संकेतस्थळ आज सुरू केले.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील केजरीवाल सरकार आणि पंजाबमधील भगवंत मान सरकारच्या कामगिरीचे प्रदर्शन करण्यासाठी आम आदमी पक्षाने रामनवमीचे औचित्य साधून ‘आप का रामराज्य’ (आपचे रामराज्य) हे संकेतस्थळ आज सुरू केले.

राज्यसभा खासदार संजय सिंह, मंत्री आतिशी, सौरभ भारद्वाज आणि आणि जस्मिन शाह यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत हे संकेतस्थळ सुरू झाल्याचे सांगितले. रामराज्य साकारण्यासाठी ‘आप’ काम करत असून या संकेतस्थळावर पक्षाची रामराज्याची संकल्पना मांडण्यात आल्याचे या नेत्यांनी सांगितले.

आम आदमी पक्षाने पक्षाने दिल्ली आणि पंजाबमध्ये काय काम केले आहे, हे या संकेतस्थळावर पाहता येईल, असे संजय सिंह यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘आमच्या सरकारने केलेल्या कामांची जगभरात वाखाणणी होत असून अमेरिकेच्या अध्यक्षांच्या पत्नीही केजरीवाल यांनी तयार केलेल्या शाळा बघण्यासाठी आल्या होत्या.

भगवान रामाने ज्याप्रमाणे संघर्ष केला त्याचप्रकारे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली आणि पंजाबमधील लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे.’’ योग्य उमेदवाराला मतदान कसे करता येईल हे जनतेला ‘आप का रामराज्य’ संकेतस्थळ पाहून ठरवता येईल, असे आतिशी म्हणाल्या.

‘आप’च्या नेत्यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. दिल्लीतील विकास कामांमध्ये केंद्र सरकारकडून अडथळे आणले जात असल्याचा आरोप आतिशी यांनी केला. तर, मंत्री सौरभ भारद्वाज यांनी पंजाब आणि दिल्ली मॉडेलचा अर्थ कल्याणकारी रामराज्याशी संबंधित असल्याचा दावा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amazon Prime Day Sale: आला रे आला अमेझॉनचा ‘प्राइम डे सेल’ आला; मध्यरात्रीच सुरू होतोय धडका, मोठी संधी चुकवू नका!

Shambhuraj Desai : मंत्री शंभुराज देसाईंचे थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनाच आव्हान... म्हणाले,

Latest Marathi News Updates: खडकवासला धरण परिसरात प्रेमी युगलाने दिला जीव

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

SCROLL FOR NEXT