Atishi Marlena 
देश

Delhi CM Atishi: दिल्लीत आता आतिषी सरकार! मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी संपन्न; नव्या मंत्रिमंडळात कोणाचा समावेश? जाणून घ्या

यामध्ये केजरीवाल सरकारमधील मंत्री असलेल्या खुद्द अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया, संजय सिंह यांचा नव्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नाही.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी आतिषी मार्लेना यांचा शपथविधी शनिवारी पार पडला. यावेळी नवं मंत्रीमंडळही स्थापन झालं असून 5 नव्या मंत्र्यांचे शपथविधी देखील यावेळी पार पडले. राजभवनात नायब राज्यपालांनी त्यांना मंत्रिपदाची शपथ दिली. दिल्लीच्या आतिषी सरकारमध्ये कोण नवे मंत्री असतील जाणून घेऊयात.

दिल्लीच्या नव्या सरकारचे प्रमुख अर्थात मुख्यमंत्री म्हणून आतिषी मार्लेना असतील. तसंच त्यांच्या मंत्रिमंडळात सौरभ भारद्वाज, गोपाल राय, मुकेश अहलावत, इम्रान हुसैन, कैलाश गहलोत या आम आदमी पार्टीच्या आमदारांनी मंत्रिपदाच्या शपथा घेतल्या. Atishi Marlena takes oath as CM of Delhi

पण यामध्ये केजरीवाल सरकारमधील मंत्री असलेल्या खुद्द अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया, संजय सिंह यांचा नव्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नाही. या तिन्ही नेत्यांवर सध्या दिल्लीच्या अबकारी कर घोटाळ्यात ईडी आणि सीबीआयकडून चौकशी सुरु आहे. सध्या हे तिघेही न्यायालयीन कोठडीत राहिल्यानंतर जामिनावर बाहेर आले आहेत.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आठवड्याभरापूर्वी आपण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती. तेव्हापासूनच नवा मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा रंगली होती. अखेर खुद्द केजरीवाल यांनीच मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्या मंत्रिमंडळात शिक्षणमंत्री राहिलेल्या आतिषी मार्लेना यांच्या नावाची घोषणा केली.

केजरीवाल यांच्यासह मनिष सिसोदिया हे प्रमुख नेते तुरुंगात असताना आतिषी यांनी दिल्ली सरकारचा कारभार चांगल्या प्रकारे चालवला होता. तसंच आपल्या नेत्यांची बाजून त्यांनी आक्रमकपणे लावून धरली होती. तसंच त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे आरोप झालेले नसल्यामुळं मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Vidarbha News: भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार; जाम महामार्गावर नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकीने वाहनाला धडक

SCROLL FOR NEXT