Arvind Kejriwal Death Threat Latest News 
देश

Arvind Kejriwal News : केजरीवालांना ठार मारण्याची धमकी! मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेवरून 'आप' नेत्यांचा भाजपवर हल्लाबोल

Arvind Kejriwal Death Threat Latest News दिल्लीतील राजीव चौक व पटेल चौक या मेट्रो स्टेशनमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ठार मारण्याची धमकी देणारा मजकूर आढळला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : दिल्लीतील राजीव चौक व पटेल चौक या मेट्रो स्टेशनमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ठार मारण्याची धमकी देणारा मजकूर आढळला आहे. यावरून आपच्या नेत्यांनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला असून मुख्यमंत्री केजरीवाल यांना ठार मारण्याचा सुनियोजित कट रचला जात असल्याचा आरोप ‘आप’च्या नेत्यांनी केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री केजरीवाल जामीनावर असून खासदार स्वाती मालीवाल यांनी केलेल्या आरोपामुळे आपच्या अडचणीत वाढ झाली आहे. आज दिल्लीतील वर्दळीच्या कॅनॉट प्लेसमधील राजीव चौक मेट्रो स्टेशन व तेथून जवळच असलेल्या ल्यूटन्स झोनमधील पटेल चौक मेट्रो स्टेशनमध्ये मुख्यमंत्री केजरीवाल यांना ठार मारण्याचा इंग्रजीतील मजकूर आढळून आला आहे. हाच मजकूर आरोपींनी सोशल मीडियावरही व्हायरल केला आहे. मेट्रो स्टेशनमध्ये सीआयपीएफची सुरक्षा असताना धमकीचा मजकूर कसा लिहिला गेला, असा सवाल दिल्लीच्या अर्थमंत्री आतिशी मार्लेना यांनी उपस्थित केला आहे.

खासदार स्वाती मालिवाल प्रकरणातून काहीही हाती न लागल्याने भाजपने आता केजरीवाल यांना जिवे मारण्याच्या धमक्यांचे सत्र सुरू केले आहे. यापूर्वी तुरुंगात असताना केजरीवाल यांना इन्सुलिन घेण्यास प्रतिबंध केला होता. अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांनी इन्सुलिन देण्याची परवानगी देण्यात आली. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या जिवाला धोका असल्याचा आम्ही आरोप करीत आहोत. आज आढळून आलेल्या धमक्यांनी या आरोपांची पुष्टी झाल्याचा दावा आतिशी मार्लेना यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

मुख्यमंत्र्यांच्या घरातील व्हीडिओ समोर आल्यानंतर मालिवाल प्रकरणातील हवा निघून गेली आहे. केजरीवाल यांच्या विरोधात एका खोट्या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने जामीन देऊन भाजपच्या साऱ्या मनसुब्यावर पाणी फेरले आहे. या सर्व योजना अयशस्वी झाल्यानंतर आता धमक्या देऊन मुख्यमंत्र्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिवे मारण्याची धमकी दिल्यानंतरही दिल्ली पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. स्वाती मालिवाल यांच्या खोट्या आरोपांची चौकशी करण्यासाठी तत्परता दाखविणारे दिल्ली पोलिस मात्र मूग गिळून असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: दुसऱ्या T20I सामन्यातील भारताच्या पराभवानंतर गौतम गंभीरचं सूर्यकुमारसोबत वाजलं? Viral Video मुळे चर्चेला उधाण

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी घेतली मृत डॉक्टर युवतीच्या कुटुंबियांची भेट; ''राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने लढा...''

Georai News : बीडच्या गेवराईत रहात्या घरातच युवकाने गळफास घेऊन जीवन संपविले; कारण अस्पष्ट

Parner News : वाळू वाहतुकदारास दंड करणा-या अधिकाऱ्यांकडूनच १५ लाख ५१ हजार रुपये दंड वसूल केला जाणार

Akola News : बीपी तपासायला सांगताच घातला गोंधळ, उपचार सुरु असतानाच रुग्णाच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT