Raghav Chadha Esakal
देश

Raghav Chadha:'इंडिया' आघाडीच्या प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा डाव, 'आप'नेते राघव चड्ढा यांचा आरोप

विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीतील प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा केंद्रातील मोदी सरकारचा डाव असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.

सकाळ डिजिटल टीम

Raghav Chadha Alleged Modi Government:

विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीतील प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा केंद्रातील मोदी सरकारचा डाव असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. ज्या नेत्यांना अटक केली जाण्याची शक्यता आहे. त्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षातील नेत्यांचाही समावेश आहे, असे चढ्ढा म्हणाले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीची नोटीस मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. केजरीवाल यांना तुरुंगात टाकून दिल्लीतील लोकसभेच्या सातही जागांवर कब्जा करण्याचा भाजपचा डाव आहे, असे सांगून राघव चढ्ढा पुढे म्हणाले की, केजरीवाल यांना अटक केल्यानंतर पुढचा नंबर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा राहील.

त्यापाठोपाठ राजदचे तेजस्वी यादव, तृणमूलच्या ममता बनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना अटक केली जाईल. यानंतर केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन, तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांना अटक होऊ शकते, असे चढ्ढा म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wani News : सप्तशृंगगडावर आज रंगणार कोजागरीचा महासोहळा; कावड यात्रेसह तृतीयपंथीयांचा छबिना उत्सव

Aapli ST App : बस स्टँडवर एसटीची वाट बघत थांबताय? तुमचं टेन्शन मिटलं! ‘Aapli ST’ अ‍ॅपवर कळणार Live लोकेशन, पण कसं? पाहा एका क्लिकवर

थैलावाचा साधेपणा! रस्त्यावर केलं जेवण, कामातून घेतला आध्यात्मिक ब्रेक

Mud Volcano: अंदमानमधील चिखलाचा ज्वालामुखी सक्रिय; भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पाठवणार संशोधन पथक

Ahilyanagar News:'अहिल्यानगर शहरात प्रेम विवाहातून प्राणघातक हल्ले वाढले'; जोडप्यांचा टोकाचा निर्णय..

SCROLL FOR NEXT