AAP MP Sanjay Singh Allegation Tihar jail looks like a concentration camp marathi Political News  
देश

Arvind Kejriwal Arrest : तिहार तुरुंगाला छळछावणीचे स्वरूप; 'आप'च्या खासदाराचा गंभीर आरोप

Arvind Kejriwal Arrest : दिल्लीच्या मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळालेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तिहार तुरुंगात आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या आमदारांना दिल्लीकरांच्या सेवेचा संदेश पाठविल्यावरून तुरुंगात असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चौकशी सुरू झाली असून केंद्र सरकार तिहार तुरुंगाला छळछावणी बनवू पाहात आहे, असा खळबळजनक आरोप आप नेते व खासदार संजयसिंह यांनी आज केला.

दिल्लीच्या मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळालेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तिहार तुरुंगात आहेत. त्यांना मिळणाऱ्या कथित वागणुकीवरून पक्षाचे नेते व राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषेद केंद्र सरकारवर आरोप केला. ते म्हणाले, की तीन वेळा प्रचंड बहुमत मिळविणारे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना केंद्र सरकार हिटलरशाही पद्धतीने तुरुंगात ठेवत आहे. तुरुंगात गंभीर गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारांच्याही मानवाधिकारांचे पालन केले जाते आणि ते आपल्या कुटुंबीयांशी, वकिलांशी चर्चा करू शकतात. परंतु केजरीवाल यांचा हा हक्क हिरावून घेतला जात आहे, असा दावा संजयसिंह यांनी केला.

संजयसिंह म्हणाले, की केजरीवाल यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या वकिलांमार्फत आमदारांना संदेश पाठविला होता. पक्षाच्या आमदारांनी मतदारसंघात जावे आणि जनतेच्या समस्या सोडवाव्यात, असे त्यांनी म्हटले होते. परंतु या संदेशामुळे केजरीवाल यांची चौकशी सुरू केली आहे आणि कुटुंबीयांशी व वकिलांशी भेट बंद होऊ शकते, अशी धमकी दिली जात आहे. मुख्यमंत्री केजरीवाल तुरुंगातून आपल्या कुटुंबीयांची, वृद्ध मातापित्यांची विचारपूस करू शकत नसतील आणि वकिलांशी बोलू शकत नसतील तर ते खटला कसा लढू शकतात.

केजरीवाल यांनी दोन कोटी दिल्लीकरांची सेवा केली यासाठी त्यांना शिक्षा मिळते आहे काय, केजरीवाल आणि वकील यांच्या कायदेशीर मुलाखतीच्या वेळी आठ ते दहा पोलिस तिथे हजर असतात, हा कोणता नियम आहे. तिहार तुरुंगाला छळछावणी बनविले जात आहे काय, अशी सवालांची फैर संजय सिंह यांनी झाडली. तिहार तुरुंगाचे अधिकारी केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करत आहेत, असाही आरोप संजयसिंह यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAKISTAN SEMIS SCENARIOS : न्यूझीलंड हरला, म्हणून पाकड्यांनी जास्त फडफडू नये! उपांत्य फेरीचं समीकरण पाहताच येईल चक्कर...

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT