Sanjay Singh suspended News Sanjay Singh suspended News
देश

Sanjay Singh Suspended : आपचे खासदार संजय सिंह राज्यसभेतून निलंबित

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : आपचे (AAP) राज्यसभा खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांना संसदेच्या कामकाजातून निलंबित करण्यात आले आहे. घोषणाबाजी, कागद फाडणे व सभापतींच्या खुर्चीच्या दिशेने फेकल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. चालू आठवड्यातील कारवाईसाठी संजय सिंह यांना निलंबित करण्यात आले आहे. (Sanjay Singh suspended News)

गुजरातमध्ये बनावट दारू पिल्याने झालेल्या मृत्यूचा मुद्दा आपचे (AAP) संजय सिंह (Sanjay Singh) यांनी सभागृहात उपस्थित केला होता. यावेळी घोषणाबाजी करणे, पेपर फाडणे आणि स्पीकरच्या खुर्चीकडे फेकल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. गुजरातमधील बोटाडमध्ये बनावट दारू प्यायल्याने ३७ जणांचा मृत्यू झाला. तर ५० हून अधिक जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बुधवारी सभागृहात गदारोळ झाल्याने राज्यसभेतील (Rajya Sabha) १९ खासदारांना आठवडाभरासाठी निलंबित करण्यात आले. या राज्यसभा खासदारांना सभागृहात प्रवेश करून घोषणाबाजी केल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे. या खासदारांमध्ये तृणमूलच्या खासदार सुष्मिता देव, डॉ. शांतनु सेन आणि डोला सेन, शांता छेत्री, मोहम्मद अब्दुल्ला, ए. ए. रहीम, एल. यादव आणि व्ही. शिवदासन, अबीर रंजन बिस्वास, नदीमुल हक यांचा समावेश आहे.

सोमवारी लोकसभेत विरोधी खासदारांनी महागाई आणि जीएसटीच्या वाढत्या दरांविरोधात निदर्शने केली. लोकसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी काँग्रेसच्या चार खासदारांवर कारवाई करण्यात आली. मणिकम टागोर, टीएम प्रतापन, ज्योतिमनी व रम्या हरिदास यांना हंगामासाठी निलंबित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishalgad Qurbani Permission : किल्ले विशाळगडावर उरुस काळात सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देण्यास बंदी; मांसाहार नेण्याबाबत कोर्टाचा काय आहे आदेश?

Vishnu Sahasranama: अधिक मासात विष्णू सहस्त्रनामाचा जप का करतात? रोजही वाचण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे

Latest Marathi News Live Update : नीटची परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

Pargaon News : अष्टविनायक महामार्गावर अनेक ठिकाणी डांबर उखडून पडले खड्डे; तर महामार्गावरील अनेक बसथांब्यांची दुरावस्था झाली आहे

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

SCROLL FOR NEXT