ANI
ANI
देश

मोदी टीव्हीवर रडतील; खासदाराचं वक्तव्य एका महिन्यात ठरलं खरं

सूरज यादव

निवडणुकीवेळी प्रचारसभा घेतल्या. त्यातून कोरोनाचा प्रसार केला आणि आता रडून नाटक करत आहेत अशा शब्दांत संजय सिंह यांनी मोदींवर निशाणा साधला.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी वाराणसीतील (Varanasi) डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी भावुक झाले होते. व्हिडिओ कॉन्फरन्समधला मोदींचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातच आता आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांनी आपण मोदींबद्दल केलेली भविष्यवाणी खरी ठरल्याचा दावा केला आहे. संजय सिंह यांनी एप्रिल महिन्यात असं वक्तव्य केलं होतं की, ''पंतप्रधान मोदी देशातील कोरोना परिस्थितीबाबत बोलताना टीव्हीवर येऊन रडतील.'' संजय सिंह यांनी दोन्ही व्हिडिओ एकत्र करून शेअर केला आहे. (AAP MP tweet share old video which claim modi will cry on tv)

आम आदमी पार्टीनेसुद्धा याबाबत एक पत्रक जारी करून संजय सिंह यांनी केलेला दावा खरा ठरल्याचं म्हटलं आहे. राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी 17 एप्रिलला एक मुलाखत दिली होती. त्यामध्ये केलेलं भाकीत खरं ठरलं असल्याचं आम आदमी पार्टीने पत्रकात म्हटंल आहे. मुलाखतीत संजय सिंह यांनी म्हटलं होतं की, आणकी काही दिवस वाट बघा, ते तुमच्यासमोर येतील. ते फक्त त्यांच्या लाइट आणि कॅमेऱ्यासाठी वाट बघत आहेत. ते टीव्हीवर रडतील आणि देशातील माध्यमे पंतप्रधान कसे भावुक झाले आणि रडले ते दाखवतील.

संजय सिंह यांनी मुलाखतीतील व्हिडिओ शेअर करत मोदींवर टीका केली आहे. संजय सिंह म्हणाले की, 17 एप्रिलला बोललो होतो, 21 मे रोजी खरं ठरलं. देशाला संवेदनशील आणि चांगलं मन असलेली व्यक्ती पाहिजे. ढोंगी पंतप्रधान देशाला नको आहेत ज्यांनी, निवडणुकीवेळी प्रचारसभा घेतल्या. त्यातून कोरोनाचा प्रसार केला आणि आता रडून नाटक करत आहेत अशा शब्दांत संजय सिंह यांनी मोदींवर निशाणा साधला.

मोदी म्हणाले की, कोरोनाविरोधातील या लढ्यात आपण आपल्या जवळच्या अनेक लोकांना गमावलं आहे. ब्लॅक फंगस हे सध्या आव्हान आहे. तसंच लहान मुलांना कोरोनापासून वाचवणं गरजेचं असल्याचंही मोदींनी म्हटलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR Live Score: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT