Swati Maliwal 
देश

Swati Maliwal: प्रत्येकाचं सत्य जगासमोर येईल; स्वाती मालिवाल यांनी नाव न घेता साधला निशाणा

Swati Maliwal tweets: स्वाती मालिवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी गैरवर्तन आणि मारहाण झाल्याचा आरोप केला आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- आपच्या राज्यसभेतील खासदार स्वाती मालिवाल यांनी 'एक्स'वर पोस्ट केली आहे. यातून त्यांनी आरोपीवर निशाणा साधला आहे. 'नेहमीप्रमाणे हा राजकीय हिटमॅन स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्या लोकांना ट्वीट करायला लावून आणि अर्धवट व्हिडिओ शेअर करुन त्यांना वाटतंय की तो स्वत:ला वाचवू शकतो', असं त्या पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत.

स्वत:ला मारहाण केल्याचा कोण व्हिडिओ शूट करेल? घरातील आणि रुममधील सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर सर्व सत्य समोर येईल. कितीही खालची पातळी गाठा, देव सर्व पाहात आहे. एका दिवशी प्रत्येकाचं सत्य जगासमोर येईल, असंही त्या पोस्टमध्ये म्हणाल्या आहे.

स्वाती मालिवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी गैरवर्तन आणि मारहाण झाल्याचा आरोप केला आहे. मालिवाल यांनी कोणाचेही नावं न घेता म्हटलंय की, 'तो स्वत:ला वाचावण्याचा प्रयत्न करत आहे. पण सत्य समोर येणार आहे. सगळ्याचं सत्य समोर येईल.'

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असताना मालिवाल यांनी हे ट्वीट केलं आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक महिला सोफ्यावर बसली आहे. तिच्या शेजारी काही सुरक्षा कर्मचारी आहेत. त्यांच्यामध्ये वाद होतो. असा दावा केला जातोय की, हा व्हिडिओ १३ मे रोजीचा आहे. शिवाय हा व्हिडिओ केजरीवाल यांच्या निवासस्थानातील असल्याचं सांगितलं जातं. मात्र, व्हिडिओची सत्यता पडताळण्यात आलेली नाही.

स्वाती मालिवाल यांनी दावा केलाय की, केजरीवाल यांचे खासगी सचिव बिभव कुमार यांनी त्यांना मारहाण केली आहे. चापटा, लाथा मारण्यात आल्या. असाही दावा केला जातोय की, जेव्हा मारहाण झाली तेव्हा अरविंद केजरीवाल हेदेखील निवासस्थानी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT