satyandra jain esakal
देश

Video: 'आप'च्या या नेत्याला जेलमध्ये VIP ट्रिटमेंट; खळबळजनक Video Viral

संतोष कानडे

नवी दिल्ली: मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये तिहार जेलमध्ये असलेले दिल्ली सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे.

सत्येंद्र जैन यांना जेलमध्ये व्हीआयपी ट्रिटमेंट मिळतेय. त्यांची आरामात मालिश सुरु असल्याचा हा व्हीडिओ आहे. या व्हीडिओनंतर जेल प्रशासनावर आक्षेप घेतले जात आहेत. याप्रकरणी ईडीने कोर्टात तक्रार दाखल केलीय.

केजरीवाल सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन हे मनी लाँड्रिंग प्रकरणात तिहार जेलमध्ये आहेत. जेलमध्ये असूनही जैन हे सुखासीन आयुष्य जगत असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. सीवीटीव्ही फुटेजमध्ये ते मसाज घेत आहेत. हा व्हीडिओ समोर आल्यानंतर भाजपने आम आदमी पार्टीवर निशाणा साधला आहे.

सत्येंद्र जैन यांना ३० मे रोजी ईडीने ताब्यात घेतलं होतं. सत्येंद्र जैन हे तिहार जेलमध्ये सात नंबरच्या सेलमध्ये आहेत. हे प्रकरण समोर आल्यानंतर जेल अधीक्षक यांच्यासह चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झालीय. शिवाय ३५ पेक्षा अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या ड्यूटीचं ठिकाण बदललं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT